शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

गणरायांना जल्लोषात निरोप; मिरवणुकीवर ड्रोनने ठेवली नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 18:54 IST

गुलालासह फुलांची उधळण़़ पारंपरिक वाद्यांसह डिजेचा दणदणाट़़ संगीताच्या तालावर थिरकणारी तरूणाई आणि बाप्पांचा जयघोष अशा जल्लोषपूर्ण वातावरणात मंगळवारी नगरकरांनी लाडक्या गणरायांना भावपूर्ण निरोप दिला़

अहमदनगर : गुलालासह फुलांची उधळण़़ पारंपरिक वाद्यांसह डिजेचा दणदणाट़़ संगीताच्या तालावर थिरकणारी तरूणाई आणि बाप्पांचा जयघोष अशा जल्लोषपूर्ण वातावरणात मंगळवारी नगरकरांनी लाडक्या गणरायांना भावपूर्ण निरोप दिला़ सकाळी दहा वाजता सुरू झालेला हा मिरवणूक सोहळा रात्री बारा वाजता समाप्त झाला़ किरकोळ अपवाद वगळता ही मिरवणूक शांततेत पार पडली़सकाळी साडेआठ वाजता जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्याहस्ते शहराचे ग्रामदैवत विशाल गणपतीची विधीवत पूजा होऊन मिरवणूक सोहळ्याला प्रारंभ झाला़ फुलांच्या रथात बाप्पांना विराजमान करत निघालेली ही मानाची मिरवणूक नगरकरांच्या डोळयाचे पारणे फेडणारी ठरली़ ३५० पैकी एकूण १५ गणेश मंडळे मिरवणूक सोहळ्यात सहभागी झाली होती़ शहरातील रामचंद्र खुंट येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला़ माळीवाडा येथील समझोता मंडळ, शिवसेना व नवरत्न मंडळाने मिरवणुकीत डिजे वाजविला़ डिजेच्या तालावर रंगलेले गाणे आणि तरूणांचे नृत्य यामुळे रात्री साडेअकरापर्यंत मिरवणूक नवीपेठेच्या मागेच रेंगाळली होती़ पंधरापैकी सात मंडळांनीच निर्धारित वेळेत विसर्जन केले. उर्वरित आठ मंडळांनी रात्री बारानंतर मूक वातावरणात विसर्जनस्थळी जाऊन विसर्जन केले़ ही मिरवणूक पाहण्यासाठी नगरकरांनी मोठी गर्दी केली होती़ जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, सहाय्यक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, उपाधीक्षक आनंद भोईटे हे वरिष्ठ अधिकारी मिरवणूक मार्गावर तळ ठोकून होते़ मिरवणूक मार्गात सहभागी झालेल्या प्रत्येक मंडळासाठी स्वतंत्र पोलीस पथक नेमण्यात आले होते़ त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार झाला नाही़ मंडळाच्या गणपतीसमवेतच पथकही चालत होते़ रात्री बाराच्या ठोक्याला पोलिसांनी डिजेचा दणदणाट बंद करून डिजे ताब्यात घेतले़लक्षवेधी मिरवणूकपारंपरिक पद्धतीने आणि वैशिष्ट्यपूर्ण मिरवणुकीसाठी ओळखल्या जाणाºया विशाल गणपती मंदिरात प्रतिष्ठापना केलेल्या श्रींची मिरवणूक यंदाही मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली़ महिलांच्या दांडिया, विद्यार्थ्यांचे लेझीम पथक आणि ढोलपथकाने मिरवणुकीत रंगत आणली़ सायंकाळी सातनंतर ही मिरवणूक दिल्लीगेटबाहेर पडली़ मिरवणुकीत आ़ संग्राम जगताप, खा़दिलीप गांधी, माजी आमदार अनिल राठोड व माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी सहभागी होत ढोलताशांवर ताल धरला होता़ महापौर सुरेखा कदम व त्यांचे पती संभाजी कदम यांनी मानाच्या गणपतीचा रथ ओढून सहभाग घेतला़