शेकडो शेतकऱ्यांकडून सोयाबीन व इतर मालाची खरेदी करून मुथ्था हा कुटुंबीयांसह फरार झाला होता. तो पोलिसांना चकवा देत होता. दोन महिन्यांनंतर आरोपींना अटक करण्यात यश आले होते. दोन दिवसांपूर्वी जिल्हा न्यायालयाने मुथ्था कुटुंबातील चार आरोपींना जामीन मंजूर केला होता.
मुथ्था याचे माळवाडगाव येथे किराणा व भुसार मालाचे दुकान आहे. जामीन मिळताच गावात दुकानाशी संबंधित कामासाठी तो गावात आल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळाली, थोड्याच वेळात शेकडो लोक तेथे दाखल झाले. बँक ऑफ महाराष्ट्रच्या गावातील शाखेबाहेर लोकांनी मुथ्था याला घेरले. बुडविलेल्या पैशांचा त्याला जाब विचारला. यावेळी महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
अखेर जमावासमोर येऊन आपण कुठेही फरार होणार नाही. काळजी करू नका. सर्वांचे पैसे देण्यास मी तयार आहे असा मुथ्था याने केला.
जमावाने शांततेचा मार्ग अवलंबला, अन्यथा अनुचित प्रकार घडला असता. गावातील ज्येष्ठ मंडळींनी मध्यस्थी करीत कारमध्ये बसवून मुथ्थास मार्गस्थ केले.
मुथ्था याच्याकडून पैसे वसूल करण्याचे मोठे आव्हान उभे आहे. त्यामुळे शेतकरी तणावाखाली आहेत. त्याच्यावर बँकांचेही मोठे कर्ज असून, त्याचीही परतफेड मुथ्था याला करावी लागणार आहे.
---