शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

 दिवसागणिक वाढताहेत मानसिक रुग्ण; कंपन्याही नाकारतात विमा संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 16:23 IST

साहेबराव नरसाळे /  अहमदनगर : मानसिक रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, जिल्हा रुग्णालयात रोज सुमारे ६० ते ७० रुग्ण ...

साहेबराव नरसाळे / अहमदनगर : मानसिक रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, जिल्हा रुग्णालयात रोज सुमारे ६० ते ७० रुग्ण उपचारासाठी येतात. तर खासगी दवाखान्यांमध्ये हा आकडा शेकड्यात असल्याचे सांगण्यात येते. मानसिक आजारांवरील महागड्या उपचारांवर लाखो रुपये खर्च होत आहेत. मात्र, आरोग्य विमा कंपन्यांनी मानसिक आजाराला विमा संरक्षण नाकारले आहे.मानसिक आजारांचे रुग्ण वाढत आहेत. मानसिक आजारांवरील उपचारपद्धती ही दीर्घ काळाची असते. त्यामुळे त्यावरील खर्चही सामान्य कुटुंबांच्या आवाक्याबाहेर जातात. मानसिक आजारांमध्ये नैराश्य व चिंतारोग हे प्रामुख्याने आढळून येतात.  कॅन्सर, मधुमेह, रक्तदाब असे आजार असलेल्या रुग्णांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक आढळून येते. स्किझोफ्रेनिया, बायपोलर, ओसीडी या विकारांनी ग्रस्त रुग्णांची संख्याही वाढत आहे. स्किझोफ्रेनिया रुग्णांमध्ये संशयी वृत्ती वाढीस लागते. बाळंतीण महिलांच्या मनात सातत्याने भीती दाटून येते. यामुळे काही प्रसंगात असे रुग्ण अगदी टोकाची पावले उचलतात. एखाद्यावर हल्ला करणे, जीव घेणे असे प्रकार घडतात. तर काही रुग्ण घराबाहेर पडायला घाबरतात. यातून मानसिक प्रकृती अधिक ढासळते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. बायपोलर या आजारात रुग्ण काही आठवडे किंवा महिने नैराश्यात तर काही आठवडे किंवा महिने संबंधित रुग्ण हर्षवायू झाल्यासारखा वावरतो. त्याच्या मनात अचाट कल्पना येत राहतात आणि काहीतरी तो अद्भूत असल्यासारखे बरळतो. सध्या नैराशातून होणा-या आत्महत्या हा सरकार व सर्वांपुढील मोठा गहन प्रश्न आहे. सतत आत्महत्येचे विचार मनात घोळत असणारे अनेक रुग्णही डॉक्टरांकडे उपचारासाठी येत आहेत. या उपचारांवरील इलेक्ट्रोकन्वल्सिव्ह थेरपी म्हणजे शॉक ट्रिटमेंट हा उपचार प्रभावी मानला जातो. तसेच रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रॅनिअल मॅग्नेटिक (आरटीएमएस), थीटा बर्स्ट असे विविध उपचार आहेत. काही उपचार प्रदीर्घ काळ घ्यावे लागतात. मात्र, हे सर्व उपचार खर्चिक आहेत. अनेक रुग्णांना आर्थिक चिंतेमुळे मानसिक आजार जडलेले असतात. त्याशिवाय उपचारांवरील खर्चही परवडणारा नसतो. त्यामुळे अनेकदा उपचार टाळले जातात. त्यामुळे मानसिक आजारांना आरोग्य विम्याचे संरक्षण मिळणे गरजेचे आहे. मात्र, आरोग्य विमा कंपन्या कोणत्याच पॅकेजमध्ये मानसिक आजारांचा समावेश करीत नाहीत. मानसिक आजारात ‘इंटरनेट’ची भर सध्या इंटरनेट प्रत्येकाच्या हातात आले आहे. या इंटरनेटच्या अतिवापरामुळेही मानसिक रुग्णांमध्ये वाढ होत आहे. इंटरनेटवरील विविध अ‍ॅप्लीकेशन, त्यातून वाढलेले नैराश्य आणि त्वरित उपचार न घेतल्यामुळे वाढणारी हिंसक प्रवृत्ती ही सध्या सर्वांपुढील गंभीर समस्या आहे. 

विभक्त कुटुंबपद्धती, बेरोजगारी, व्यसनाधिनता, कौटुंबिक हिंसा, स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान, आर्थिक चिंता अशा अनेक कारणांमुळे मानसिक आजार बळावत आहेत, अशी माहिती मानसोपचार तज्ज्ञ डॉ़. अशोक कराळे यांनी दिली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरhospitalहॉस्पिटल