लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे ग्रामरक्षक दलाच्या स्थापनेसाठी विशेष ग्रामसभेचे बुधवारी आयोजन करण्यात आले मात्र किरकोळ उपस्थिती असल्याने सभा तहकूब करावी लागली. त्यामुळे ग्रामरक्षक दल केव्हा स्थापन होणार असा उपस्थित केला जात आहे . राज्यात सर्वत्र दारू बंदी करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून गावपातळी वर ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्याचे धोरण सरकारने घेतले आहे. या पार्श्वभूमीवर वांबोरी ग्रामपंचायतीत निवासी नायब तहसीलदार संजय तळेकर यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली होती. यावेळी उपसरपंच दतात्रय गांधले, तलाठी रुपाली टेमक, भाऊसाहेब ढोकणे, सदस्य दतात्रय मोरे आदी उपस्थित होते. एकूण मतदारांच्या किमान ५०% ग्रामस्थ या ग्रामसभेला उपस्थित राहणे आवश्यक होते.
वांबोरीत ग्रामरक्षक दलासाठी बोलावलेली सभा तहकूब
By admin | Updated: July 5, 2017 14:17 IST