शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मापात पाप; २६ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 11:35 IST

: वजन मापात हेराफेरी तसेच पॅकबंद वस्तंंूची विक्री करताना मापात पाप करणाऱ्या ६१३ विक्रेत्यांंवर वैध मापन शास्त्र विभागाने गेल्या वर्षभरात कारवाई करत त्यांना २६ लाख ५८ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे़

अहमदनगर : वजन मापात हेराफेरी तसेच पॅकबंद वस्तंंूची विक्री करताना मापात पाप करणाऱ्या ६१३ विक्रेत्यांंवर वैध मापन शास्त्र विभागाने गेल्या वर्षभरात कारवाई करत त्यांना २६ लाख ५८ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे़कारवाई झालेल्यांमध्ये ४४३ वजनमापाचे प्रकरणे असून, १७० कारवाई या पॅकबंद वस्तूच्या विक्रीसंदर्भातील आहेत़ वजन करून ग्राहकांना माल देताना कमी माल देणे, नादुरुस्त वजनमाप वापरणे, वजनमापाची पडताळणी करून न घेणे आदी बाबी आढळून आल्या आहेत़दुकानातून पॅकबंद वस्तूंची विक्री करताना किमतीत खाडाखोड करणे, मालाच्या वजनापेक्षा ग्राहकांकडून जास्त पैसे घेणे अशी १७० प्रकरणे वैध मापन विभागाला तपासणी मोहिमेत आढळून आली आहेत़ या विक्रेत्यांवर वैद्यमापन शास्त्र अधिनियम २००९ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे तर सहा जणांविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता़न्यायालयात निकाल होऊन त्यांना १७ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे़ वैध मापन शास्त्रविभागाच्या धडक कारवाईनंतर विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.वर्षभरात अवघ्या १४ तक्रारीवैध मापनशास्त्र विभागाविषयी शहरी व ग्रामीण भागातील ग्राहकांना विशेष माहिती नाही़ वजनमापासंदर्भात या विभागाकडे मागील वर्षभरात अवघ्या १४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत़ बहुतांशी ठिकाणी वजनात फसवणूक झाली तरी ग्राहक तक्रार करण्यास टाळाटाळ करतात़पेट्रोलपंपावर माप ठेवने सक्तीचेपेट्रोलपंपावर इलेक्ट्रॉनिक माप व्यवस्थित असले तरी पेट्रोल टाकणाºया कर्मचाºयाकडून कमी पेट्रोल दिले जाऊ शकते़ अशावेळी ग्राहकांना शंका आली तर प्रत्येक पेट्रोलपंपावर हाताने पेट्रोल मोजता येतील अशी मापे ठेवलेली असतात़ तसेच अशी मापे ठेवणे हे सक्तीचे आहे़ ग्राहकांनी त्या मापात विकत घेतलेल्या पेट्रोलची पडताळणी करावी़ यात फसवणूक झाली असेल तर तत्काळ वैध मापनशास्त्र विभागाकडे तक्रार करावी असे आवाहन वैध मापनशास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक अलकेश गेटमे यांनी केले आहे़दिलेल्या किमतीत योग्य वजनाची वस्तू मिळणे हा ग्राहकांचा अधिकार आहे़ कुठेही माल घेताना वजनात फसवणूक झाली तर ग्राहकांनी हा विषय टाळून न देता थेट वैध मापनशास्त्र कार्यालयाकडे तक्रार करावी, प्रत्येक ग्राहकाच्या तक्रारीची योग्य दखल घेऊन पुढील कार्यवाही केली जाते़ - अलकेश गेटमे, सहायक नियंत्रक, वैध मापनशास्त्र विभाग

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर