शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
2
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
3
महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
4
अफगाणिस्तानातून कोणकोणत्या नद्या पाकिस्तानच्या दिशेने वाहतात? तालिबानने प्रवाहच रोखला तर काय होईल?
5
भारतीय नर्सला सिंगापूरमध्ये १४ महिन्यांचा कारावास अन् २ चाबकाचे फटके; असं नेमकं काय घडलं?
6
IND vs AUS 3rd ODI : 'या' पठ्ठ्यानं कोच गंभीरचा विश्वास ठरवला सार्थ! ऑस्ट्रेलियनं संघ २३६ धावांवर ऑलआउट
7
जैन बोर्डिंगचा व्यवहार १ तारखेच्या अगोदर रद्द नाही झाला तर संपूर्ण देशभर मोठे आंदोलन; जैन मुनींचा इशारा
8
पाकिस्तान पुन्हा तोंडघशी पडला; UN मध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित करताच भारतानं दाखवला आरसा
9
Shreyas Iyer Brilliant Catch : श्रेयसनं घेतला जबरदस्त कॅच! पण ऑस्ट्रेलियन बॅटरसह त्यानंही सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?
10
ट्रम्प आता चीनशी पंगा घेणार...! जिनपिंग यांना थेट तैवानवरून जाब विचारणार, आशियाच्या दौऱ्यावर निघाले
11
Pandav Panchami 2025: आजच्या काळात काय आहे पांडव पंचमीचे महत्त्व? तिलाच 'लाभ पंचमी' का म्हणतात?
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर; मोदी सरकारनं 'या' प्रस्तावाला दिली मंजुरी, जाणून घ्या
13
VIRAL : एका आठवड्यात पैसे परत करेन म्हणणारी 'ऑनलाइन' मैत्रीण पालटली! १५ हजारांची मदत करणार्‍यालाच सुनावलं
14
पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात...
15
कॅनडाच्या 'त्या' जाहिरातीत असं काय होतं की डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड झाला? व्यापार करार रोखला!
16
Health Tips: ऑक्टोबर हीट कमी करण्यासाठी सकाळी अंशपोटी प्या 'हे' मॅजिक ड्रिंक 
17
विवाहित महिला पुतण्याच्या प्रेमात पडली, लिव्ह-इनमध्ये राहिली; वाद सुरू होताच आयुष्य संपवलं! आता पती म्हणाला...
18
IND vs AUS : DSP सिराजला 'रिमांड'वर घेण्याच्या मूडमध्ये होता हेड; पण त्याच्यावरच आली ‘अरेस्ट’ होण्याची वेळ
19
Manifestation Tips: पैसा, मनःशांती, समाधान, जे हवं ते सगळं मिळेल; फक्त रोज करा 'हे' तीन उपाय
20
परेश रावल यांनी 'दृश्यम ३'ला दिला नकार; कारण सांगत म्हणाले, "स्क्रिप्ट खूप चांगली आहे पण..."

महापौर पदासाठी सेना-भाजपात लढत

By admin | Updated: June 17, 2016 23:35 IST

अहमदनगर : २१ जून रोजी होत असलेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत सत्तेसाठी आसुसलेल्या सेनेला कॉँग्रेस-राष्ट्रवादीने सुरूंग लावला.

अहमदनगर : २१ जून रोजी होत असलेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत सत्तेसाठी आसुसलेल्या सेनेला कॉँग्रेस-राष्ट्रवादीने सुरूंग लावला. सेना-भाजप युतीत दुफळी घडवून आणत सेना-भाजपमध्येच महापौर पदाची निवडणूक लावली. भाजपच्या खासदार दिलीप गांधी गटाला राष्ट्रवादी-कॉँग्रेसने साथ देत सेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. सेनेच्या सुरेखा संभाजी कदम व भाजपच्या नंदा मनेष साठे यांच्यात महापौर पदासाठी सरळ लढत होत आहे. विद्यमान महापौर अभिषेक कळमकर यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपत असल्याने २१ जून रोजी महापौर पदाची निवडणूक होत आहे. सेनेने महिनाभरापूर्वीच सत्तेची व्यूहनिती आखून नगरसेवकांना सहलीवर रवाना केले. सत्ता होईल या चिंतेने ग्रासलेल्या आघाडीने युतीत फूट पाडण्याचा डाव टाकत तो यशस्वी केला. महापौर पदाच्या निवडणुकीत उमेदवार न देता आघाडीने भाजपमधील गांधी गटाचे उमेदवार मनेष साठे यांच्यामागे पाठबळ उभे केले. राष्ट्रवादीच्या बरोबरीने कॉँग्रेसनेही गांधी गटाशी हातमिळवणी केली. महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या भाजप नगरसेविका नंदा साठे यांच्या अर्जावर राष्ट्रवादीचे तर उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले श्रीपाद छिंदम यांच्या अर्जावर सूचक, अनुमोदक म्हणून कॉँग्रेस नगरसेवकांची नावे आहेत. त्यावरून भाजप (गांधी गट)-राष्ट्रवादी-कॉँग्रेस अशी नवीन शहर विकास आघाडी उदयास आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. भाजपमधील गांधी गटाचे नगरसेवक महापालिकेत पोहोचल्यानंतर त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, माजी आमदार दादा कळमकर व महापौर अभिषेक कळमकर हे समर्थक नगरसेवकांच्या लवाजाम्यासह महापालिकेत पोहचले. प्रांगणातच भाजप-आघाडीच्या नगरसेवकांनी एकमेकांना आलिंगन देत घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर एकत्रितपणे महापौर व उपमहापौर पदाचे उमेदवारी अर्ज दाखल केले. नंदा मनेष साठे यांच्या अर्जावर सूचक म्हणून राष्ट्रवादीचे नगरसेवक विपुल शेटीया व अनुमोदक म्हणून विजय गव्हाळे यांची तर उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केलेले भाजपमधील साठे, छिंदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सेनेत अस्वस्थता पसरली. दोन वाजेच्या सुमारास सेनेचे संपर्क नेते भाऊ कोरगावकर, उपनेते अनिल राठोड हेही भाजपमधील आगरकर गटाच्या नगरसेवकांसमवेत महापालिकेत पोहोचले. त्यांनीही एकत्रितपणे महापौर पदासाठी सेनेच्या सुरेखा संभाजी कदम व उपमहापौर पदासाठी भाजपचे गटनेते दत्ता कावरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. महापालिकेतच सेना-भाजप व राष्ट्रवादी-कॉॅँग्रेस-भाजप नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. कॉँग्रेस पक्ष निरीक्षक देणार ‘प्रदेश’ला अहवालकॉँग्रेस पक्षाची भूमिका ठरविण्यासाठी प्रदेश समितीने जळगावचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना शुक्रवारी अहमदनगर शहरात पाठविले होते. ते शासकीय विश्रामगृहावर असतानाच नगरमध्ये सत्तेचे वेगळेच गणित मांडण्यात आले. त्यानंतर कॉँग्रेस नगरसेवकांनी त्यांची भेट घेत त्यांना राजकीय स्थिती कथन केली. प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी पक्षाची स्थिती व राजकीय घडामोडीची माहिती दिली. हा सगळा अहवाल ते प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना देणार आहेत. जिल्ह्यातील कॉँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून कॉँग्रेसचा निर्णय नगरसेवकांना कळविला जाणार आहे. मनसेत फुटीची चिन्हेमनसेचे चार नगरसेवक असून त्यातील किशोर डागवाले यांनी सेनेत प्रवेश केला आहे. मात्र, तरीही ते तांत्रिकदृष्ट्या मनसेचे नगरसेवक आहेत. मनसेच्या विणा बोज्जा व सुवर्णा जाधव या दोन नगरसेविका सेनेसोबत सहलीवर गेलेल्या आहेत. गट नेते गणेश भोसले हे नगरमध्येच आहेत. डागवाले व भोसले एका बाजूला गेले तर मनसेतही फूट अटळ आहे. डागवाले यांनी सेनेशी इमानदारी राखली तरीही मनसेचे तिघे एकीकडे व भोसले एकीकडे, अशी फूट पडणारच आहे. कोतकर, शेख यांच्या निर्णयाची प्रतीक्षाकॉँग्रेस नगरसेवक संदीप कोतकर यांना खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा सुनावली आहे. त्यांचे नगरसेवक पद अजूनही कायम असले तरी ते मतदानासाठी येतील का? याची उत्सुकता लागून आहे. तसेच राष्ट्रवादीचे गटनेते समद खान हेही फौजदारी प्रकरणात तुरुंगात आहेत. त्यांना अजून जामीन मंजूर झालेला नाही. त्यामुळे त्यांच्या महासभेतील हजेरीची उत्सुकता नगरकरांना लागून आहे. राजकीय घडामोडीनंतरचे बलाबलभाजप (आगरकर गट)- सेना युतीभाजप ५, सेना २० (किशोर डागवालेंसह)उषा ठाणगे, नंदा कुलकर्णी, सारीका भूतकर - ३ अपक्षविणा बोज्जा, सुवर्णा जाधव (दोन्ही मनसे) : एकूण- ३०भाजप-राष्ट्रवादी-कॉँग्रेस शहर विकास आघाडीभाजप ४, राष्ट्रवादी शहर विकास आघाडी २१, कॉँग्रेस ११, अपक्ष स्वप्नील शिंदे, मनसेचे गणेश भोसले असे ३८.(सेनेने कॉँग्रेसचे तीन व राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांना सहलीवर रवाना केले आहे. ) नव्या आघाडीचे : एकूण ३२भाजपच्या काही नगरसेवकांनी आघाडीच्या नगरसेवकांशी चर्चा करत प्रस्ताव दिला. त्यावर निर्णय घेण्यासाठी पक्षाच्या नगरसेवकांची बैठक झाली. त्यात शहर विकासाच्या दृष्टीने एकत्रित येण्याचा निर्णय झाला. भाजपला पाठिंबा देण्याचा विषय हा स्थानिक पातळीवरील आहे. सत्तेत सहभागी होणार का? असे विचारले असता, त्याचा निर्णय अजून झालेला नाही. पद वाटपाबाबतही चर्चा झालेली नाही. समन्वयाने हा निर्णय घेतला जाईल. - संग्राम जगताप, आमदार, राष्ट्रवादी.मी घेतलेला निर्णय बरोबरच आहे. मनसे-अपक्षांनी पाठिंबा दिल्याने शहर विकास आघाडी झाली. खासदार या नात्याने केंद्रातून निधी कितीही आणला तरी तो वापरताना महापौर नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत होत्या. महापौर व उमहापौर दोन्ही भाजपचे होतील. २१ जून रोजी निकाल समोर येणारच आहे. प्रदेशने निर्णय दिला का? या प्रश्नावर मात्र ‘यापेक्षा वेगळा आदेश तरी कोणता’. मी पक्षाचा शहर जिल्हाध्यक्ष आहे. त्यामुळे मी केले ते बरोबर केले. - दिलीप गांधी, खासदार, भाजपपक्षाचे निरीक्षक माजी आमदार शिरीष चौधरी यांनी शुक्रवारी नगरमध्ये घडलेल्या घडामोडींची गंभीरपणे दखल घेतली आहे. ते प्रदेश कॉँग्रेसला अहवाल सादर करतील. त्यानंतर प्रदेश कॉँग्रेस जो निर्णय देईल, त्यानुसार पक्षाची महापौर पदाच्या निवडणुकीत भूमिका असणार आहे. - दीप चव्हाण, प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष, कॉँग्रेस. देशात-राज्यात भाजप-सेनेची युती आहे. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूकही एकत्रितपणे लढविली. सेना-भाजपची राजकीय विचारणी मिळतीजुळती आहे. सेनेने भाजप शहर जिल्हाध्यक्षांशी चर्चा केल्यानंतरच पुढचे पाऊल टाकले. राजकारणात दिलेले शब्द आपण पाळला. मात्र, तरीही पक्षश्रेष्ठी देतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. - अ‍ॅड. अभय आगरकर, माजी शहरजिल्हाध्यक्ष. कॉँग्रेस-राष्ट्रवादीला महापौर पदाच्या निवडणुकीत उमेदवार देता आला नाही. त्यांनी निवडणुकीतून सपशेल माघार घेतली. सेनेचे खासदार अनिल देसाई, मंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सरचिटणीस सुरजितसिंग ठाकूर, पालकमंत्री राम शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. सेना-भाजप युती अभेद्य आहे. काही असंतुष्टांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असेल मात्र शेवटच्या क्षणी सर्व काही सुरळीत होईल. - भाऊ कोरगावकर, संपर्कप्रमुख सेना.