शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांनी पाठविले ऊर्जामंत्र्याना पत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 19:40 IST

शहरातील पाणी उपसा केंद्राचे भारनियमन त्वरित बंद करण्यासाठी महापौर सुरेखा कदम यांनी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठविले आहे.

ठळक मुद्देपाणी उपसा केंद्रांचे भारनियमन रद्द करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शहरातील पाणी उपसा केंद्राचे भारनियमन त्वरित बंद करण्यासाठी महापौर सुरेखा कदम यांनी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठविले आहे. यामध्ये भारनियमनामुळे ऐन सणासुदीत शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून अत्यावश्यक सेवेतील विशेष बाब म्हणून विद्युतपुरवठा सुरळित करण्याच्या सूचना यंत्रणेला करण्याची मागणी बावनकुळे यांच्याकडे महापौर कदम यांनी केली आहे. 

अहमदनगर महापालिकेच्या वतीने वसंतटेकडी येथून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. या ठिकाणाहून ग्रामीण भागासाठी टँकरही भरले जातात. शहरात पाणी वितरणासाठी वसंतटेकडी येथे मोटारीव्दारे पाणीवाटपासाठी उंच टाक्या भरल्या जातात. त्यानंतर पाण्याचे वितरण केले जाते. मात्र गेल्या १० ते १२ दिवसांपासून या भागाचा विजपुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा वितरणाच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. परिणामी शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. आगरकर मळा, बाळाजी बुवा संपवेल, लालटाकी येथील वितरण केंद्राचांही विद्युत पुरवठा खंडीत केला जात आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. ऐन सणासुदीत तीव्र पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. ही परिस्थिती विचारात घेऊन पाणीपुरवठा केंद्र वसंतटेकडी, आगरकर मळा संपवेल, सिध्दार्थनगर उंच टाकी, बाळाजी बुवा संपवेल या ठिकाणी भारनियमन करु नये, याबाबत आपण विशेष लक्ष्य घालून विद्युत पुरवठा सुरळित ठेवण्याचे आदेश महावितरणला द्यावेत, असेही महापौर सुरेखा कदम यांनी पत्रात म्हटले आहे.