शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

‘माऊली’ने दिला तीला जगण्याचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 12:31 IST

अहमदनगर : रात्रीच्या अंधारात एका हैवानाने तिची इज्जत लुटली होती, दिवसाच्या उजेडात मात्र अनेक साºया हैवानांनी तिच्या विवस्त्र शरीराचे फोटो आणि शुटिंग घेत रस्त्यावर तिला बेईज्जत केले. या घटनेतून लोकांच्या सामाजिक जाणीवा किती बोथट झाल्यात याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. मात्र जगाची माऊली बनलेल्या डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सूचेता धामणे यांनी तीला आधार दिला.

अहमदनगर : रात्रीच्या अंधारात एका हैवानाने तिची इज्जत लुटली होती, दिवसाच्या उजेडात मात्र अनेक साºया हैवानांनी तिच्या विवस्त्र शरीराचे फोटो आणि शुटिंग घेत रस्त्यावर तिला बेईज्जत केले. या घटनेतून लोकांच्या सामाजिक जाणीवा किती बोथट झाल्यात याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. मात्र जगाची माऊली बनलेल्या डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सूचेता धामणे यांनी तीला आधार दिला.

नगर शहरातील पुणे रोडवरील रेल्वेब्रिज परिसरात सोमवारी (दि. २०) पहाटे आरोपी अभय बाबूराव कडू ( वय ५८ रा. आनंदनगर सिंहगड रोड, पुणे) याने त्याच्या कारमध्ये २७ वर्षीय मनोरूग्ण तरुणीला मारहाण करत तिच्यावर अत्याचार केला. या प्रसंगाने घाबरून गेलेली ही तरूणी विवस्त्र अवस्थेत कारमधून बाहेर पळाली. तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. मंगळवारी (दि. २१) सकाळी ती शहरातील चांदणी चौक परिसरात आली. रस्त्यावर विवस्त्र तरुणी पाहून जाणाºया-येणाºयांनी मोबाईलमध्ये तिचे फोटो काढले तर काहींनी तिचे शुटिंग केले. या विवस्त्र तरुणीच्या अंगावर कपडे टाकावेत, तिला सुरक्षित ठिकाणी घेऊन जावे, पोलिसांशी संपर्क करावा, असे फोटो आणि शुटिंग घेणाºयांपैकी कुणालाच वाटले नाही. ती तरुणी कधी रस्त्यावर थांबत होती तर कधी पळत होती. सकाळी नऊ वाजता डॉ. मुकुंद शिंदे व सामाजिक कार्यकर्ते सुरेश खामकर यांच्या निदर्शनास ही तरुणी आली. शिंदे व खामकर यांनी तत्काळ माउली सेवा प्रतिष्ठानचे संचालक डॉ. राजेंद्र धामणे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर सदर तरुणीच्या अंगावर कपडे टाकण्याचा खामकर यांनी प्रयत्न केला. मात्र तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगामुळे त्या तरुणीला कसलीच शुद्ध नव्हती. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास डॉ. राजेंद्र व सुचेता धामणे हे रुग्णवाहिका घेऊन आले. दरम्यान खामकर यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी निर्भया पथकही दाखल झाले होते. पोलिसांच्या मदतीने सदर तरुणीस रुग्णवाहिकेत बसून माउली सेवा प्रतिष्ठान येथे उपचारासाठी दाखल केले. रुग्णवाहिकेतून जाताना ही तरुणी आरडाओरड करून कडू नावाच्या माणसाने मला मारले, माझ्यावर अत्याचार केला, असा अकांत करत होती.

दरम्यान या घटनेतील आरोपी अभय कडू याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात डॉ. सुचेता धामणे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

कोण आहे ती पीडित तरुणीवर्धा येथील ही पीडित तरुणी स्वभावाने भोळसर असल्याने ती औरंगाबाद शहरात एकटीच राहत होती. आरोपी अभय कडू हा महिनाभरापूर्वी औरंगाबाद येथे गेला तेव्हा ही तरुणी त्याच्या निदर्शनास आली. तो तिला कारमधून पुणे येथे घेऊन गेला. आरोपीने एक महिना त्या तरुणीला त्याच्याजवळ ठेवून तिच्यावर अत्याचार केला. सोमवारी रात्री अभय कडू त्या तरुणीला घेऊन औरंगाबाद येथे निघाला होता. पहाटेच्या सुमारास कार नगर-पुणे रोडवरील रेल्वे ब्रिजजवळ आली. यावेळी कडू याने कार रस्त्याच्या बाजूला घेऊन तरुणीला विवस्त्र करून तिच्यावर अत्याचार केला. या प्रसंगाने घाबरून गेलेली ही तरुणी विवस्त्र अवस्थेत कारमधून बाहेर पळाली. 

नगर शहरातील चांदणी चौक परिसरात मंगळवारी सकाळी विवस्त्र अवस्थेत एक तरुणी रस्त्यावरून फिरत होती. तेव्हा येणारे जाणारे अनेक जण तिचे फोटो आणि शुटिंग घेत होते. ही तरुण कोण आहे, रस्त्यावरती अशा अवस्थेत का फिरत आहे. याचे कुणालाच काही देणेघेणे नव्हते. या तरुणीबाबत काहीतरी गंभीर घटना घडलेली असावी, असा अंदाज आल्याने याबाबत प्रथम पोलिसांना माहिती देण्यात आली. तसेच माउली सेवा प्रतिष्ठानचे संचालक डॉ. राजेंद्र धामणे यांना कळविण्यात आले. त्यानंतर सदर तरुणीस सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.    - सुरेश खामकर, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :AhmednagarअहमदनगरWomenमहिला