शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मातृवंदना योजनेत नगर जिल्ह्यातून साडेसहा हजार गरोदर मातांचे अर्ज अपलोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 19:29 IST

पंतप्रधान मातृवंदना योजना जिल्ह्यात लागू करण्यात आली असून, महिनाभरात जिल्ह्यातील साडेसहा हजार गरोदर मातांचे अर्ज योजनेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक अर्ज नगर जिल्ह्यातून प्राप्त झाले असून, गरोदर मातांच्या बँक खात्यावर पाच हजार रुपये जमा होणार आहे.

अहमदनगर : पंतप्रधान मातृवंदना योजना जिल्ह्यात लागू करण्यात आली असून, महिनाभरात जिल्ह्यातील साडेसहा हजार गरोदर मातांचे अर्ज योजनेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक अर्ज नगर जिल्ह्यातून प्राप्त झाले असून, गरोदर मातांच्या बँक खात्यावर पाच हजार रुपये जमा होणार आहे. त्यामुळे गर्भावस्थेत बाळांची व मातांची काळजी घेण्यासाठी लागणा-या पैशांची चिंता मिटणार आहे.केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने सुरू केलेल्या प्रधामंत्री मातृवंदना योजनेची राज्यात अमंलबजावणी करण्यात येत आहे. दारिद्य्ररेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील अनेक महिलांना गर्भावस्थेत व प्रसुतीनंतरही मजूरी करावी लागते. परिणामी मातांसह बालकांचे कुपोषण होते. त्यामुळे माता-बालमृत्यूच्या घटना घडतात. त्यावर मात करण्यासाठी मातांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अनुदान देण्याचे सरकारने जाहीर केले आहे.सरकारने ८ डिसेंबर रोजी योजना राबविण्याचा आदेश काढला. नववर्षात योजना सुरू करण्यात आली आहे. पहिल्या अपत्यासाठी ही योजना लागू आहे. गर्भधरणा ते प्रसूती व नंतर अशा तीन टप्प्यांत पाच हजार रुपयांचे आनुदांना मातांना मिळणार आहे. महिलांना या काळात काम न करता सकस आहार मिळावा, यासाठी सदर अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ६ हजार ५०३ गरोदर मातांनी अर्ज दाखल केले असून, प्राथमिक अरोग्य केंद्रामार्फत ते मातृवंदना योजनेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहेत. त्यात दररोज वाढ होत असून, ही संख्या वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने त्यासाठी जिल्ह्यात जनजागृती अभियान हाती घेण्यात आले आहे.

नोकरदार वगळता सर्व मातांना लाभ

मातृवंदना योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील सर्व महिलांना मिळणार आहे. नोकरदरांना मात्र यातून वगळण्यात आले आहे. गर्भधारणा नोंदणीवेळी १ हजार रुपये, गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यात २ हजार रुपये (तपासणी आवश्यक) आणि प्रसुतीनंतर बालकाची जन्मनोंद आणि तिसरा डोस पूर्ण झाल्यानंतर २ हजार रुपये अनुदान बँक खात्यात किंवा पोस्ट खात्यात जमा केले जाणार आहेत.

ही कादपत्रे आवश्यक

गरोदर मातांकडे स्वत: अधार कार्ड असणे बंधनकारकबँकेचे पासबुकची छायांकित प्रत आवश्यक

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर