शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

'मास लीडर' मुळे 'मास्क' दुसऱ्यांदा चर्चेत,मास्क घातलेल्या नेत्यांचे फोटो होतायत व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 16:22 IST

अरुण वाघमोडे अहमदनगर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात 'मास्क' ही वस्तू  दुसऱ्यांदा चर्चेचा विषय ठरली आहे. कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर ...

अरुण वाघमोडेअहमदनगर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात 'मास्क' ही वस्तू  दुसऱ्यांदा चर्चेचा विषय ठरली आहे. कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर सुरुवातीला नगरमध्ये मास्कचा तुटवडा निर्माण झाला होता तेव्हा आणि आता मास्क न घातल्यामुळे आमदार संग्राम जगताप यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे.

सध्या सोशल मीडियावर मास्क न घातलेले नेते आणि मंत्री यांचे फोटो व्हायरल होत आहेत. काही सजग नागरिकांनी तर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक व्हाट्सअपवर मास्क न  घातलेल्या नेत्यांचे फोटो सेंट करून यांच्यावरही गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे.

चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे  आमदार संग्राम जगताप यांचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारत असताना त्यांनी चेहऱ्याला  मास्क घातलेले नव्हते. जगताप यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले होते. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोतवाली पोलिस ठाण्यात आ. जगताप यांच्यासह इतर 25 ते 30  जणांविरोधात सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी  गुन्हा दाखल करण्यात आला. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर गुन्हा दाखल झाल्याने मास्क हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला.

 

जगताप यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर सरकारी बैठका घेताना तसेच शहरात विविध ठिकाणी फिरताना मास्क न घातलेल्या नेते, मंत्री आणि कार्यकर्त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. प्रशासनाने यांच्यावरही गुन्हा दाखल करावा, अशाही प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. दरम्यान सोमवारी आमदार संग्राम जगताप यांनी कार्यकर्त्यांसह पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांची भेट घेतली. ही भेट मात्र श्रीगोंदा येथील कामासंदर्भात होती असे जगताप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. .......................

आता 'मास्क'बाबत नेते, कार्यकर्ते सतर्क

मास्क न घातल्याने आमदारांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने नगरमधील विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते गेल्या दोन दिवसांपासून घराबाहेर पडतात चेहऱ्याला मास्क घालत आहेत..............

सार्वजनिक ठिकाणीसोशल डिस्टंसिंगचा फज्जा

लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर नगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी दररोज सोशल डिस्टंसिंगचा फज्जा ऊडताना दिसत आहे. खरेदी-विक्री, मदतीचे वाटप, विविध कार्यक्रम, आंदोलन आदी ठिकाणी उपस्थित असलेले अनेक जण सध्या कोणाची साथ सुरू आहे हेच विसरून जात असल्याचे दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी, असे मत सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.