शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेस तब्बल दीड लाख रुपये दरमहा पोटगी; श्रीरामपूर न्यायालयाचा निवाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 12:41 IST

विवाहितेस तब्बल दीड लाख रुपये दरमहा पोटगी देण्याचा अंतरिम आदेश श्रीरामपूरच्या वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने दिला. विशेष म्हणजे अमेरिकेत स्थायिक असलेल्या पतीचा तेथील राहणीमानाचा दर्जा व आर्थिक मिळकत निकाल देताना गृहित धरण्यात आली आहे.

ठळक मुद्देविवाहितेस तब्बल दीड लाख रुपये दरमहा पोटगी देण्याचा अंतरिम आदेश श्रीरामपूरच्या वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने दिला.विशेष म्हणजे अमेरिकेत स्थायिक असलेल्या पतीचा तेथील राहणीमानाचा दर्जा व आर्थिक मिळकत निकाल देताना गृहित धरण्यात आली आहे. अमेरिकेत अभियंता असलेले महेश ज्ञानदेव गवारे (मूळ राहणार शिरसगाव, ता.श्रीरामपूर) व सोनाली (पूर्वाश्रमीची सोनाली राजेंद्र डावखर, श्रीरामपूर) यांच्यातील हा पोटगीचा वाद होता.

श्रीरामपूर : विवाहितेस तब्बल दीड लाख रुपये दरमहा पोटगी देण्याचा अंतरिम आदेश श्रीरामपूरच्या वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने दिला. विशेष म्हणजे अमेरिकेत स्थायिक असलेल्या पतीचा तेथील राहणीमानाचा दर्जा व आर्थिक मिळकत निकाल देताना गृहित धरण्यात आली आहे. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान वकिलांना अमेरिकन दुतावासाशी अनेकदा संपर्क करावा लागला.येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश कमला बोरा यांनी हा अभूतपूर्व निकाल दिला. येथील न्यायालयाने पोटगीसंबंधी दिलेल्या निवाड्यातील हा मोठा निकाल मानला जात आहे. त्याचे स्वागत केले जात आहे. अमेरिकेत अभियंता असलेले महेश ज्ञानदेव गवारे (मूळ राहणार शिरसगाव, ता.श्रीरामपूर) व सोनाली (पूर्वाश्रमीची सोनाली राजेंद्र डावखर, श्रीरामपूर) यांच्यातील हा पोटगीचा वाद होता. सोनाली यादेखील उच्चशिक्षित असून, त्यांना आठ वर्षे वयाची एक मुलगी आहे. पतीने नांदायला घेऊन जावे, यासाठी सन २०१४ मध्ये त्यांनी याचिका दाखल केली होती.हिंदू विवाह कायदा कलम ९ प्रमाणे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने दीड वर्षापूर्वी ५० हजार रुपये दरमहा पोटगी देण्याचा आदेश दिला होता. मात्र न्यायालयाची नोटीस मिळाली नसल्याने आपणास म्हणणे मांडता आले नाही, असा युक्तिवाद गवारे यांनी केला. न्यायालयाने सोनाली यांचा अर्ज रद्द करीत गवारे यांना म्हणणे मांडण्यास संधी दिली. त्याविरोधात सोनाली यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली.उच्च न्यायालयाने सोनाली यांना दिलासा म्हणून अडीच लाख रुपये देण्याचे आदेश दिले. त्यानंतर याचिका श्रीरामपूर येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाकडे वर्ग केली. सोनाली यांच्या वतीने अ‍ॅड.भागचंद चुडीवाल यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड.सुहास चुडीवाल यांनी सहाय्य केले.......................पतीच्या राहणीमानाचा दर्जा धरला ग्राह्यन्यायालयाने निकालादरम्यान पतीच्या अमेरिकेतील राहणीमानाचा दर्जा ग्राह्य धरला. सोनाली यांना अमेरिकास्थित नोकरी गमवावी लागल्याने मुलीचा सांभाळ व तिच्या शिक्षणाचा खर्च गृहित धरीत तब्बल दीड लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय देण्यात आला. खटल्यादरम्यान अ‍ॅड. चुडीवाल यांना अमेरिकन दुतावासाची मदत घ्यावी लागली. सोनाली यांनी आपल्या मूळ अर्जात पुन्हा पतीसमवेत नांदण्याची मागणी केली आहे. त्यावर न्यायालयीन लढा सुरू आहे.-------------------------------------------------------------

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूरCourtन्यायालय