दि. १४ ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार रोहित पवार यांनी मॅरेथॉनला हिरवा ध्वज दाखवून शुभेच्छा दिल्या. मॅरेथॉन कर्जत-अहमदनगर रस्त्यावर तीन किलोमीटरपर्यंत आयोजन केले होते. त्यात ७७ छात्र सैनिकांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे आयोजन मेजर डाॅ. संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळ कांबळे, राजेंद्र फाळके, तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस उपअधीक्षक दौलतराव जाधव, नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कुंडलिक अवसरे, काकासाहेब तापकीर, बळीराम यादव, नितीन धांडे, मेजर डॉ. संजय चौधरी, प्रा. किसन सूळ, प्रा. प्रकाश धांडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
या मॅरेथॉनबद्दल कर्नल जीवन झेंडे, कर्नल विनय बाली, सुभेदार मेजर लंकेदर सिंग, सुभेदार सतेंदर सिंग, गणेश वामन, शंकर मेना, विलास मोढळे यांनी अभिनंदन केले.
-----------
फोटो - १४एनसीसी
दादा पाटील महाविद्यालयातील एनसीसी छात्रसैनिकांच्या मॅरेथाॅन स्पर्धेला पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार रोहित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला.