शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

मराठीचा बडेजावपणा मिरवायला आवडते - सोनाली कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 19:34 IST

हिंदी, मराठी,तेलगू, गुजराती, कन्नड, इटालियन सिनेमात वेगवेगळ्या भूमिका वठविल्या असल्या तरी माझे मराठीवर वेगळेच प्रेम आहे. मराठीचा बडेजावपणा मिरवायला मला आवडते. मातृभाषा आली नाही तर अपमानास्पद वाटते, असे सोनाली कुलकर्णी म्हणाल्या.

श्रीरामपूर : हिंदी, मराठी,तेलगू, गुजराती, कन्नड, इटालियन सिनेमात वेगवेगळ्या भूमिका वठविल्या असल्या तरी माझे मराठीवर वेगळेच प्रेम आहे. मराठीचा बडेजावपणा मिरवायला मला आवडते. मातृभाषा आली नाही तर अपमानास्पद वाटते. भाषेमुळे माझे आकलन होऊन संस्कार घडले. घरात शैक्षणिक वातावरण असताना आई वडिलांच्या प्रेरणेने चित्रपटामध्ये भूमिका करु शकले. आजपर्यंत ८० पेक्षा जास्त चित्रपटात काम केले व ७ चित्रपट प्रदर्शित होणार असले तरी मराठी सिनेमात भूमिका करणे मला आवडते. मराठी भाषेबद्दल मला अभिमान आहे, असा दिलखुलास संवाद सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मंगळवारी येथे पत्रकारांशी साधला.गणेशोत्सवानिमित्त त्या येथे आल्या असता पत्रकार बाळासाहेब आगे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, मला ज्या शिक्षकांनी अभिनय करण्यास घडविले त्यांची मी ऋणी आहे. मराठी सिनेमा निर्मात्यांच्या खर्चावर मर्यादा असतात. विनाकारण खर्च परवडत नाही. हिंदी सिनेमा निर्मात्याचे बजेट मोठे असते. मराठीवाल्यांना खर्च करुन ९० टक्के यश प्राप्ती कठीण असते. मराठी चित्रपट पाहण्याकडे कल कमी असला तरी मीडियावाल्यांनी जागृती करुन मराठी सिनेमातील कलाकारांना व सिनेरसिकांना प्रोत्साहित करावे.नाना पाटेकर यांच्या समवेत भूमिका करण्याची मिळालेली संधी हे माझे भाग्यच म्हणावे लागेल. आपण मोठे कलाकार आहोत याची सहकलाकाराला जाणीव होऊ देत नाही. त्याच्याकडून चांगले काम करुन घेण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. त्यांच्यासारखा एखादाच असतो. जो चित्रपट मी करीत असते, तो मला आवडतो. दिग्दर्शक होण्याइतकी मॅच्युरिटी माझ्यात आलेली नाही, त्यामुळे धाडस करणार नाही,असेही त्या म्हणाल्या.इंटरनेटवर पाहिला सिनेमासोशल मीडियामुळे आजच्या पिढीमध्ये जागरुकता आली आहे. काजवा महोत्सव पाहण्यासाठी पुरुषवाडी (घोटी) येथे गेले असता तेथे चित्रपटगृह नसतानाही आदिवासी लोकांनी सैराट सिनेमा पाहिल्याचे सांगितले. त्यांना कोठे पाहिला असे विचारले असता त्यांनी इंटरनेटवर पाहिल्याचे सांगितले. हे ऐकून आनंद झाला, असे सोनाली कुलकर्णी म्हणाल्या.सैराट व फ्रेंड्ली चित्रपटाचे कौतुक करतानाच मिशन कश्मीर व देवराई, डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटातील भूमिका आवडल्या.