शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आंदोलन पुन्हा पेटणार :मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 12:34 IST

मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिक महसूल विभागीय संवाद यात्रेचा शुभारंभ येत्या शुक्रवारी नगर शहरातून करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

अहमदनगर : मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिक महसूल विभागीय संवाद यात्रेचा शुभारंभ येत्या शुक्रवारी नगर शहरातून करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. नगर शहरात शुक्रवारी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संवाद यात्रेस प्रारंभ होणार आहे. पारनेर, श्रीगोंदा, कोपर्डी, कर्जत, जामखेड, आष्टी, कडा मार्गे पाथर्डीला मुक्काम होईल. दुसऱ्या दिवशी शनिवारी शेवगाव, नेवासा, राहुरी, श्रीरामपूर, बाभळेश्वर, राहाता, शिर्डी, कोपरगाव, येसगाव मार्गे यात्रा येवला गावात पोहोचणार आहे़ संगमनेर,अकोले तालुक्यातील मराठा समाज बांधव बाभळेश्वर व कोपरगाव येथे संवाद यात्रेत सहभागी होतील. येवला येथून नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचे पदाधिकारी नाशिक विभागात यात्रेचे आयोजन करणार आहेत.त्यानंतर येत्या २६ नोव्हेंबर रोजी यात्रा विधानमंडळावर धडकणार आहे. या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. या बैठकीला संजीव भोर, संजय अनभुले, शिवाजी चौधरी, मदन मोकाटे, सचिन चौगुले, अ‍ॅड. सुभाष जंगले, अ‍ॅड. नितीन पठारे, संदीप चोरमले, विजय पठारे, मयूर वांढेकर, प्रमोद भासार, मंगेश आजबे, शरद कार्ले, नंदकुमार कोतकर, विशाल म्हस्के, गणेश शिंदे, शरद दळवी, अमोल पाठक, दीपक मोरे, ज्ञानदेव दिघे, राजेंद्र कर्डिले, मच्छिंद्रनाथ म्हस्के, प्रकाश कदम, गोरख आढाव आदी उपस्थित होते़मराठा समाजाच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी सरकार पुरस्कृत काहींनी मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाच्या सुरूवातीपासून सातत्याने फासे टाकण्याचे काम केले. सरकारच्या प्रलोभनाला बळी पडलेल्या काही स्वार्थी लोकांनी भडकाऊ भाषा, हिंसक आंदोलने याद्वारे आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचाही प्रयत्न केला़मराठा क्रांती नावाची संघटना व राजकीय पक्ष अशी उठाठेव करून समाजाची फसवणूक काहींनी चालविली आहे़ आंदोलकांना विचलित करण्यासाठी मराठा पक्षाची बतावणी काही संधीसाधू करत आहेत.अशा फाजिल गोष्टींना समाजाने भीक घालू नये. समाजातील संभ्रम दूर करणे, जागृती करणे, मराठा तरुणांना आत्महत्यांपासून परावृत्त करीत निर्णायक व व्यापक आंदोलनाची तयारी करण्याच्या उद्देशाने मराठा संवाद यात्रा आयोजित करण्याचा निर्णय राज्य समन्वय समिती व कोअर कमिटीने जाहीर केल्याचे यावेळी सांगण्यात आले़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर