शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अनेकांची लूट : दोन मुलींसह सात ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 18:02 IST

आंबट शौकीनांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना निर्जनस्थळी बोलवून लुटणाऱ्या टोळीतील सात सदस्यांना पोलिसांनी गजाआड केले.

श्रीरामपूर : आंबट शौकीनांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना निर्जनस्थळी बोलवून लुटणाऱ्या टोळीतील सात सदस्यांना पोलिसांनी गजाआड केले. जिल्ह्यात त्यांनी अनेकांना ठगविले असले तरी बदनाम होण्याच्या भीतीने कुणीही पोलिसांसमोर आले नव्हते. अखेर एका प्राध्यापकास श्रीरामपूर शहरात टोळीने हिसका दाखविल्याने हा प्रकार समोर आला आहे.आरोपींमध्ये टोळी प्रमुख राजन अशोक ब्राम्हणे (वय ३०, सोनगाव सात्रळ, राहुरी), प्रियंका मारुती कांगणे (वय २०, खळीपिंप्री, ता. संगमनेर), सागर रावसाहेब राक्षे (वय २३, लोणी खुर्द), ओंकार कान्हू गिते (वय २१, आश्वी खुर्द, ता. संगमनेर), किशोर शामराव भोसले (वय २६, हनुमंतगाव, ता. राहाता), गणेश शंकर रोकडे (वय २२, कोल्हार, ता.राहाता), संगीता प्रल्हाद पवार (वय २६, साई मंदिराजवळ, संगमनेर) यांचा समावेश आहे. आरोपींना सोनगाव, रांजणगाव (पुणे), संगमनेर येथून ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघा जणांचा पोलीस शोध घेत आहेत. या कामी सायबर सेलची मदत झाली.अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांनी शहर पोलीस ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत कारवाईची माहिती दिली. यावेळी उपअधीक्षक राहुल मदने, निरीक्षक श्रीहरी बहिरट यावेळी उपस्थित होते. कोपरगाव येथे मोठ्या शिक्षण संस्थेत नोकरीस असलेल्या देवळाली प्रवरा येथील प्राध्यापकास या टोळीने सोमवारी (दि.१८) रात्री नऊ वाजेच्या दरम्यान लुटले. आरोपी प्रियंका हिने रोशनी गायकवाड या खोट्या नावाने त्यास शरीरसुखाकरिता येथे बोलविण्यात आले होते. आठ दिवसांपूर्वीच त्यास संपर्क करण्यात आला होता. ठरल्यानुसार प्रियंका ही प्राध्यापकाच्या कारमध्ये बसली. मात्र, येथील नेवासे रस्त्यावरील रेल्वे स्थानक पुलाजवळ गेले असता टोळीतील सदस्यांनी त्यास अडवून लुटले. आरोपींनी कार (एमएच ०४ जीडी ५२१९) व मोटारसायकलचा (एमएच १२ बीआर २३४२)चा वापर केला. टोळीने प्राध्यापकाकडील अठराशे रुपये व पांढºया रंगाची इंडिगो कार (एमएच १६ एबी ३६४५) ही चोरून नेली. त्यानंतर या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.मुलीसोबत अश्लील छायाचित्रे काढून अनेकांकडून पैैसे उकळण्याचे प्रकार या टोळीने केले. शिर्डी व लोणीमध्ये त्यांनी हे प्रकार केले. मात्र, बदनामीच्या भितीने फिर्याद देण्याची कुणी धाडस केले नाही. टोळीप्रमुख राजन ब्राम्हणे याने काही गुन्ह्यात स्वत:ची कार पुरविली आहे. सागर राक्षे याच्यावर आर्म अ‍ॅक्टखाली नगरला गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर