शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

जखणगावच्या बंगल्यात अनेकजण झालेत हनीट्रॅपचे शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:18 IST

अहमदनगर : श्रीमंतांना जाळ्यात ओढून त्यांना 'हनीट्रॅप'मध्ये अडकविणारी जखणगाव येथील महिला व तिच्या साथीदाराचा पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर या गुन्ह्याची ...

अहमदनगर : श्रीमंतांना जाळ्यात ओढून त्यांना 'हनीट्रॅप'मध्ये अडकविणारी जखणगाव येथील महिला व तिच्या साथीदाराचा पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर या गुन्ह्याची अणखी व्यापकता वाढणार आहे. सदर महिलेने अनेकांना हनीट्रॅपमध्ये अडकविल्याची जखणगाव परिसरात चर्चा आहे.

दरम्यान पोलिसांनी शनिवारी अटक केलेली महिला व त्याचा साथीदार अमोल सुरेश मोरे यांना न्यायालयाने २० मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सदर महिला श्रीमंत लोकांना हेरून त्यांना शरीर संबंधाचे आमिष दाखवून त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करत ब्लॅकमेल करत होती. सदर महिलेने तिच्या साथीदाराच्या मदतीने अनेकांचे अश्लील व्हिडिओ चित्रीकरण करत त्यांच्याकडून मोठ्या रकमा उकळल्याची चर्चा आहे. पोलिसांनीही त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. ज्यांची अशा पद्धतीने फसवणूक झाली आहे त्यांनी तक्रारीसाठी पुढे, यावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. नवऱ्यापासून वेगळी राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेचा जखणगाव येथे आलिशान बंगला आहे. काही दिवसांपूर्वी तिने मोठा बागायतदार आणि व्यावसायिक असलेल्या व्यक्तीला आपल्या जाळ्यात ओढले. एप्रिल महिन्यात बंगल्यात बोलावून त्याला शरीर संबंध करण्यास भाग पाडले. यावेळी व्हिडिओ चित्रीकरण करत त्या व्यावसायिकाकडे तब्बल एक कोटीची खंडणी मागितली. तसेच त्याला मारहाण करून त्याच्याकडील पैसे व दागिनेही लुटले. महिलेचा त्रास असह्य झाल्याने शेवटी तो व्यावसायिक नगर तालुका पोलिसांकडे गेला आणि आपबिती सांगितली. त्यानंतर पोलिसांनी सदर महिला व तिचा साथीदार अमोल मोरे याला अटक केली.

.........