चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपचे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांची तर उपसरपंचपदी कल्पना ठोंबरे यांची निवड झाली.
सरपंच आणि उपसरपंचपदाच्या दोन्ही उमेदवारास प्रत्येकी १२ मते मिळाली. प्रतिस्पर्धी उमेदवार सरपंचपद मनीषा ठोंबरे व उपसरपंचपद दत्तू धुळे यांना प्रत्येकी तीन मते मिळाली. या निवडणुकीत भाजप तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, शिवसेनेचे नेते इंजिनिअर प्रवीण कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अशोक कोकाटे आणि बाजार समितीचे माजी संचालक बाजीराव हजारे यांनी एकत्र येत सरपंच, उपसरपंच निवडणुकीत मोर्चेबांधणी केली. त्यांनी मनसे उमेदवारासही सोबत घेऊन सत्ता प्राप्त केली.
सरपंच निवड बैठकीस नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य मनोज कोकाटे, अशोक कोकाटे, शरद पवार, वैभव कोकाटे, दीपक हजारे, संदीप काळे, दत्तू धुळे, अर्चना चौधरी, कल्पना ठोंबरे, सविता खराडे, मंगल बेल्हेकर, यशोदा कोकाटे, जयश्री कोकाटे, रिता कांबळे, मनीषा ठोंबरे उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिवाजी राऊत यांना काम पाहिले. त्यांना ग्रामविकास अधिकारी डी. वाय. मोरे व तलाठी संतोष घोळवे यांनी सहाय्य केले.
फोटो : ११ चिचोंडी
चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा निवडीनंतर ग्रामस्थांनी सत्कार केला.