शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

महामार्गांची चाळण-२ / मनमाड महामार्ग बनला मरणमार्ग, दीड कोटी खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 11:51 IST

अहमदनगर : नगर- मनमाड महामार्गाची पुरती चाळण झाली आहे़ नगर ते कोपरगाव मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत़ सर्वाधिक अवजड वाहनांची  वर्दळ असणाºया या महामार्गावर लहान-मोठी वाहने, दुचाकीस्वरांना अक्षरश: जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे़ जिल्ह्यातील मंत्र्यासह या भागातील आमदार महामार्गाच्या दुरुस्तीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे़ 

अण्णा नवथर 

अहमदनगर : नगर- मनमाड महामार्गाची पुरती चाळण झाली आहे़ नगर ते कोपरगाव मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत़ सर्वाधिक अवजड वाहनांची  वर्दळ असणाºया या महामार्गावर लहान-मोठी वाहने, दुचाकीस्वरांना अक्षरश: जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे़ जिल्ह्यातील मंत्र्यासह या भागातील आमदार महामार्गाच्या दुरुस्तीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे़ 

नगर जिल्ह्यातील सर्वाधिक वाहतूक असलेला नगर- मनमाड हा एकमेव महामार्ग आहे़ नगर ते कोपरगाव हे अंतर ९६ कि़मी़ इतके आहे़ सन २००६ ते २०१० या काळात महामार्गाचे मजबूतीकरण करण्यात आले़  हे काम करणाºया विकासाकडे हा महामार्ग होता़ विकासकाची मुदत संपली़ त्यामुळे टोल वसुलीतून सुटका झाली़ पण, रस्त्याची अल्पावधीत दुरवस्था झाली़  हा महामार्ग जागतिक बँक प्रकल्प विभागाच्या अधिपत्याखाली आला़

 

दरम्यानच्या काळात रस्त्याकडे दुर्लक्ष झाले़ परिणामी ठिकठिकाणी खड्डे पडले़ साईडपट्ट्यांचा भराव पावसाच्या पाण्याने वाहून गेला़ दुभाजकाच्या बाजूने खड्ड्यांची रांग लागली़ डांबराचा थर उखडून खड्डे पडले़  हे खड्डे बुजविण्यासाठी जुलै महिन्यांत  १ कोटी ४० लाखांची निविदा काढण्यात आली़  एकूण १०० कि़मी़ साठी सहा म्हणजे १५ ते २० कि़मी़ साठी एक ठेकेदाराची नेमणूक झाली़ कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून ते आॅगस्ट अखेरपर्यंत एक-एक करून खड्डे बुजविले असते तर पावसाळ्यात रस्त्याची ही अवस्था झाली नसती़ मात्र ठेकेदारांनी वेळीच खड्डे बुजविले नाहीत़ ठेकेदार मोठे खड्डे पडण्याची वाट पाहत बसले़ जागतिक बँकेच्या अधिकाºयांनी बघ्याची भूमिका घेतली़  धो-धो पाऊस पडायला सुरुवात झाल्यानंतर सगळेच जागे झाले़ पण, पावसात बुजविलेले खड्डे फारकाळ टिकत नाहीत़ पावसात बुजवलेले खड्डे वाहून जात असल्याने पुन्हा खड्डे पडत आहेत़ वाहने खड्ड्यात आदळल्याने वाहनांचे मोठे नुकसान होत असून या मार्गावर अपघातांची संख्याही वाढली आहे़ वाढत्या अपघातांना जबाबदार कोण?  प्रशासन की ठेकेदार याची चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे़़़़१ लाख ६ हजार मेट्रिक टनाची वाहतूकनगर-मनमाड महामार्गाचा आराखडा तयार केला त्यावेळी साधारण ते ६ ते १२ टन क्षमतेची वाहने होती़ अलिकडे ३० ते ४० टनांची वाहने आली आहेत. ही वाहने या महामार्गावरून जातात़ पावसामुळे रस्ता खचतो़ रस्त्यातील पाणी काढून देण्यासाठी कसरत करावी लागते़ परिसरातील शेतकरी पाणी काढू देत नाहीत़ त्यामुळे मनमाड महामार्गाची दुरवस्था झाली असल्याचे कार्यकारी अभियंता नरेंद्र राजगुरू यांचे म्हणणे आहे़़़़दुरुस्तीच्या १३५ कोटींना कात्रीनगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी जागतिक बँक प्रकल्प विभागाने १३५ कोटींचंी तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्याचा प्रस्ताव दिला़ हा प्रस्ताव शासनाने मंजूरही केला़ परंतु, कोविड-१९ मुळे इतर खर्चाला सरकारने कात्री लावल्याने या निधीलाही बे्रक मिळाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़ ़़़मंत्री, खासदारांच्या बैठकाही निष्फळ ठरल्यानगर-मनमाड महामार्गासाठी खासदार डॉ़ सुजय विखे यांनी अनेक बैठका घेतल्या़ प्रशासनाला सूचनाही केल्या़ त्यामुळे खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले़ नगरविकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही बैठका घेतल्या़ पण, त्याचा फारसा उपयोग झाला नाही़ सध्या राज्याचे अधिवेशन सुरू आहे़ या अधिवेशानात तरी हा प्रश्न मार्गी लागेल का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे़ 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरroad safetyरस्ते सुरक्षा