टाकळीढोकेश्वर : परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने पारनेर तालुक्याला वरदान ठरलेले मांडओहळ धरण ४५ टक्के भरले आहे. धरणाची एकूण साठवण क्षमता ३९९ दशलक्ष घनफुट तर उपयुक्त साठा ३१० दशलक्ष घनफूट आहे. गेली तीन ते चार वर्षे पावसाने दडी मारल्यामुळे धरणात जेमतेम पाणीसाठा होता. त्यामुळे परिसरात पाणी टंचाई भेडसावत होती. गेल्या आठवड्यात शिंदेवाडी, पळसपूर, कातळवेढे, काळेवाडी, नंदूरपठार भागात चांगला पाऊस झाल्याने धरणात पाणी आले. त्यामुळे टाकळीढोकेश्वर, कर्जुलेहर्या, काताळवेढे व पठारावरील १६ गावांची कान्हूरपठार पाणी योजना सुरु होईल. सध्या ओढ्यांना चांगले पाणी वाहत असल्यामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ होऊ शकते. परतीच्या पावसाने अजून तरी पठार भागात चांगली हजेरी लावलेली नाही. त्यामुळे कान्हूरपठार, निवडुंगेवाडी, टाकळीढोकेश्वर, पिंपळगाव रोठा,गारगुंडी, भोंद्रे, काकणेवाडी, तिखोल या पट्ट्यात चांगल्या पावसाची गरज आहे. (वार्ताहर)
मांडओहळ धरण ४५ टक्के भरले
By admin | Updated: September 27, 2016 23:59 IST