शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांना प्रतिवादी करा

By admin | Updated: August 10, 2016 00:25 IST

अहमदनगर : महापालिकेतील गटनेतेपदाच्या वादासंदर्भात औरंगाबाद खंडपीठाने महापौर सुरेखा कदम यांनाच प्रतिवादी करा, असे आदेश याचिकाकर्त्यांना दिले आहेत.

अहमदनगर : महापालिकेतील गटनेतेपदाच्या वादासंदर्भात औरंगाबाद खंडपीठाने महापौर सुरेखा कदम यांनाच प्रतिवादी करा, असे आदेश याचिकाकर्त्यांना दिले आहेत. याबाबत पुढील सुनावणी आता २२ आॅगस्टला होणार आहे. या सुनावणीला महापौरांनी प्रत्यक्ष हजर राहण्याचेही निर्देश खंडपीठाने दिले आहेत.महापालिकेतील स्थायी समितीच्या आठ सदस्यांच्या नियुक्त्या झाल्यानंतर सर्व प्रक्रिया बेकायदेशीर असल्याने या प्रक्रियेला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी औरंगाबाद खंडपीठात केली होती. त्यावर खंडपीठात मंगळवारी सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्यावतीने नगरसेवक कुमार वाकळे, संपत बारस्कर, अ‍ॅड. प्रसन्ना जोशी आदी उपस्थित होते. गटनेते पदाच्या नियुक्त्या बेकायदेशीर केल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला होता. याचिकाकर्त्यांनी नगरसचिव, आयुक्त, राज्य शासन यांना प्रतिवादी केले होते. मात्र सदर नियुक्त्या महापौरांनी केल्या असल्याने त्यांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले नसल्याचे खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावरील पुढील सुनावणी २२ आॅगस्टला होणार आहे. (प्रतिनिधी)नगरसचिव मिलिंद वैद्य यांना उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनीच पळविले असल्याच्या अफवा शहरात सुरू होत्या, तर कोणीही पळविले नसल्याचे वैद्य यांचे म्हणणे आहे. दरम्यान, नगरसचिव यांना ताब्यात घेवून पाहिजे तशी पत्रे लिहून घेण्याचा दणका महापालिकेत सुरू आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या वैद्य यांना महापालिकेत येणे नकोसे झाले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील स्पर्धेमुळे पळवापळवीच्या अफवा सोडून देत एकमेकांचा कार्यभाग साधून घेतला जात असल्याचे प्रकार वाढले आहेत. पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले, मात्र अशी कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.