शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राला पाणीदार बनवा - आमिर खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 13:38 IST

पाणी फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत लोकसहभाग वाढत असून, लोकसहभागातून गावांना पाणीदार बनवा, असे आवाहन पाणी फाउंडेशनचे अध्यक्ष अभिनेते आमिर खान यांनी केले़ मागच्या दोन स्पर्धेत ज्या गावांनी सहभाग घेतला, त्या गावांत टँकर बंद झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले़

ठळक मुद्देजोगेवाडी येथे पाणी फाउंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत गावक-यांना प्रोत्साहित करण्यासाठी सिनेअभिनेता आमिर खान व किरण राव यांनी गावक-यांसह श्रमदान

पाथर्डी : पाणी फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत लोकसहभाग वाढत असून, लोकसहभागातून गावांना पाणीदार बनवा, असे आवाहन पाणी फाउंडेशनचे अध्यक्ष अभिनेते आमिर खान यांनी केले़ मागच्या दोन स्पर्धेत ज्या गावांनी सहभाग घेतला, त्या गावांत टँकर बंद झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले़तालुक्यातील जोगेवाडी येथे पाणी फाउंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत गावक-यांना प्रोत्साहित करण्यासाठी सिनेअभिनेता आमिर खान व किरण राव यांनी गावक-यांसह श्रमदान केले़ यावेळी श्रमदानावर आधारित लघुपटाचे चित्रीकरण करण्यात आले. आमिर खान यांच्यासमवेत किरण राव, बाळू शिंदे, प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल, तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनीही श्रमदान केले. गावाला तीनही बाजूने डोंगर असल्याने सीसीटी बंधा-यांची कामे केली जाणार आहेत.जोगेवाडीत ७ एप्रिलपासून पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून काम सुरू करण्यात आले असून, मंगळवारी दुपारी दीड वाजता पाथर्डी येथील हेलिपॅडवर आमिर खान यांचे आगमन झाले़ यावेळी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती़ उपसरपंच बाळासाहेब आंधळे यांनी आमिर खान यांचे स्वागत केले. त्यानंतर कारने जोगेवाडी गाठून आमिर खान यांनी गावकºयांशी मुक्त संवाद साधला़ आमिर खान म्हणाले, तुमच्या गावात येऊन अतिशय चांगलं वाटलं. तुम्ही खूप काम चांगल काम करत आहात़ पाणी फाउंडेशनचा वॉटर कप तुम्ही जिंक ा, अशी तुम्हाला शुभेच्छा देतो. गावासाठी पाणी उपलब्ध करून देणं खूप चांगलं काम आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा़ एका गावाने चांगल काम केलं, तर अनेक गावांना प्रेरणा मिळते़ग्रामदैवत काशिनाथाच्या मंदिरात आमिर खान यांनी आरती करून श्रमदान केले़ गावकरी ४५ दिवस श्रमदान करणार आहेत़ प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी विक्रम बांदल यांनी आमिर खान यांचे स्वागत केले़ तहसीलदार नामदेव पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीAamir Khanआमिर खान