शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एक वार्ड एक प्रतिनिधीचा निर्णय कायम ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:25 IST

अहमदनगर : नगरपालिकांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून, एक वार्ड एक प्रतिनिधी हाच निर्णय सरकारने कायम ठेवावा, अशा मागणीचे ...

अहमदनगर : नगरपालिकांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून, एक वार्ड एक प्रतिनिधी हाच निर्णय सरकारने कायम ठेवावा, अशा मागणीचे निवेदन विणकर विकास मंडळाचे निमंत्रक हिरालाल पगडाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोमवारी पाठविले आहे.

विणकर विकास मंडळाचे निमंत्रक पगडाल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की राज्य निवडणूक आयोगाने वार्डांची प्रारूप रचना करण्याचा आदेश दिला आहे. ही प्रारूप रचना करताना शासनाने ‘एक वार्ड, एक प्रतिनिधी’ आणि निवडून आलेल्या नगरसेवकांतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, काही वर्चस्ववादी शक्ती हा निर्णय बदलण्यासाठी सरकारवर दबाव आणत आहेत. जितके वार्ड लहान तितके ते छोट्या -छोट्या समूहांना निवडून येण्यास पोषक असतात. ‘एक वार्ड, एक प्रतिनिधी’ या सुत्रामुळे अठरापगड जाती, बाराबलुतेदार, आलुतेदार, छोट्या कारागीर जाती, भटक्या जाती, व्यापारी जाती यांना निवडून येण्याची अधिक संधी असते. वार्ड ऐवजी प्रभाग केल्यानंतर मतदार संख्या वाढते. त्यामुळे छोट्या छोट्या जाती समूहाचे राजकीय खच्चीकरण होते. धनदांडगे, अधिक लोकसंख्या असलेले जाती समूह यांचे फावते. त्यामुळे मोठे प्रभाग आणि त्यातून एकापेक्षा अधिक प्रतिनिधी निवडण्यास आमचा विरोध आहे. नगरसेवकांतून नगराध्यक्ष निवडल्यामुळे छोट्या वार्डांतून निवडून आलेल्या नगरसेवकाला देखील नगराध्यक्ष होण्याची संधी मिळते. सामान्य जनतेतून नगराध्यक्ष निवडणे म्हणजे अठरापगडजाती, बाराबलुतेदार, आलुतेदार, कारागीर जाती, भटक्या जाती, व्यापारी जाती यांना नगराध्यक्ष होण्याची संधी नाकारणे होय. आम्ही आपणास विनंती करतो की, ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांचे केंद्रीकरण झाले आहे. त्यांच्या दबावाखाली येऊन राज्य शासनाने आपला निर्णय बदलू नये. ‘एक वार्ड, एक प्रतिनिधी ’ हाच निर्णय कायम ठेवावा ही आमची आग्रहाची विनंती आहे.