शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीपुढे मतविभाजनाचा धोका, आघाडीत शांतता!

By admin | Updated: June 17, 2014 00:37 IST

अशोक निमोणकर, जामखेड मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सुटलेले नसतानाही लोकसभा निवडणुकीत महायुतीला विशेषत: भाजपाला मतदारसंघात मोठी आघाडी मिळाली.

अशोक निमोणकर, जामखेडमतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सुटलेले नसतानाही लोकसभा निवडणुकीत महायुतीला विशेषत: भाजपाला मतदारसंघात मोठी आघाडी मिळाली. ही आघाडी विधानसभेला कायम राहणार की काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी मतदारसंघ खेचून आणण्यासाठी एखादा नवा फॉर्म्युला राबवणार याबाबत मतदारसंघात आतापासून उत्सुकता आहे.१९९५ पासून भाजपा-सेना युतीने या मतदारसंघात सातत्याने विजय मिळवला. २००९ मध्ये २५ वर्षानंतर मतदारसंघ सर्वसाधारण उमेदवारासाठी खुला झाला. मागील विधानसभा निवडणुकीत आ.राम शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध करीत कर्जत-जामखेड तालुक्यातील भाजपाच्या नेत्यांनी शिवसेनेचे असलेले प्रा.मधुकर राळेभात यांच्या पाठीशी ताकद उभी केली होती. कर्जत येथील नामदेव राऊत यांना दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी पक्षात घेऊन पक्ष भक्कम केला होता. राऊत यांना योग्य वेळी योग्य संधी दिली जाईल, असा शब्द स्व.मुंडे यांनी दिला होता. आता राऊत काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल.शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रा.मधुकर राळेभात यांनी मागील निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. ते यावेळीही सक्रिय आहे. शिवसेनेचे उपनेते रमेश खाडे निवडणुकीची तयारी वर्षभरापासून करीत आहे. हे सर्वजण युतीत असल्याने महायुतीला मत विभाजनाचा धोका आहे. मात्र याचा फायदा घेण्याची कोणतीही रणनिती काँग्रेस आघाडीकडे दिसत नाही. त्यामुळे युतीतील इच्छुकच काँग्रेसच्या तिकिटावर डोळा ठेवून आहेत.काँग्रेस पक्षाने गेल्या वीस-पंचवीस वर्षापासून कर्जतचा उमेदवार दिला आहे. पंचायत समितीचे माजी उपसभापती अंकुश ढवळे तिकिटासाठी इच्छुक आहेत. तर कर्जतमधून राजेंद्र देशमुख, परमेश्वर पांडुळे, मिनाक्षी साळुंखे, प्रवीण घुले, अंबादास पिसाळ इच्छुक आहेत. जिल्हा परिषद सदस्य घुले यांनी मागील निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करून १८ हजार मते मिळवली होती. त्यातील ९० टक्के मतदान कर्जतमधील आहे. त्यामुळे कर्जतमधून काँग्रेसची अधिकृत उमेदवारी करण्यासाठी ते प्रयत्नशील आहे.राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडीमध्ये येथील जागा नाही परंतु या पक्षाचे दोन्ही तालुक्यात मोठे प्राबल्य आहे. जामखेडमधून तीन जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे उपसभापतीपद तर कर्जतमधून तीन जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती पक्षाच्या ताब्यात आहे. पक्ष म्हणून राष्ट्रवादीचे जाळे मतदारसंघात मजबूत आहे. या जोरावरच गेल्या निवडणुकीत राजेंद्र फाळके अपक्ष लढले होते. राष्ट्रवादीकडून राजेंद्र फाळके, राजेंद्र गुंड, दत्तात्रय वारे, शहाजी राळेभात हे इच्छुक आहेत. यापैकी जि.प. सदस्या संध्या राळेभात यांचे पती शहाजी राळेभात यांनी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष उडी घेण्याची तयारी चालवली आहे.भाजपाराम शिंदे  ४२८४५काँग्रेसकेशवराव देशमुख  ३२६७३अपक्षमधुकर राळेभात  २८५०८इच्छुकांचे नाव  पक्षराम शिंदे  भाजपाअंकुश ढवळे  काँग्रेसराजेंद्र फाळके  राष्ट्रवादीमधुकर राळेभात शिवसेना लोकसभा निवडणुकीत दिलीप गांधी यांना ४१ हजारांचे मताधिक्य