शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवांची चौकशी पूर्ण; अहवाल शासनाला सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 12:25 IST

महात्मा फुले कृषी विद्यापिठाचे कुलसचिव सोपान कासार यांचा कार्यकाल २६ फेबुवारी २०२० रोजी संपुष्टात आला आहे. तरी देखील कासार यांचे कामकाज सुरू आहे. कुलसचिव वादाच्या भोव-यात सापडले आहेत. त्यांची २४ फेबुवारीपासून सुरू झालेली चौकशी संपली आहे. महाराष्ट्र  राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे शिक्षण संचालक डॉ़ हरिहर कौसडीकर यांनी राज्य शासनाला चौकशीचा अहवाल सादर केला आहे. 

राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापिठाचे कुलसचिव सोपान कासार यांचा कार्यकाल २६ फेबुवारी २०२० रोजी संपुष्टात आला आहे. तरी देखील कासार यांचे कामकाज सुरू आहे. कुलसचिव वादाच्या भोव-यात सापडले आहेत. त्यांची २४ फेबुवारीपासून सुरू झालेली चौकशी संपली आहे. महाराष्ट्र  राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे शिक्षण संचालक डॉ़ हरिहर कौसडीकर यांनी राज्य शासनाला चौकशीचा अहवाल सादर केला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वादग्रस्त कुलसचिवांच्या गोपनीय चौकशीला २४ २६ फेबुवारीपासून पुणे येथे महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसडीकर यांच्यासमोर चौकशी सुरू झाली होती. कुलसचिवांच्या विरूध्द तक्रारदारांनी पुराव्यासह माहिती सादर केली आहे़. अहवाल गोपनीय असल्याने राज्य शासनाने कुलसचिवांबद्दल घेतलेला निर्णय नजिकच्या काळात  उघड होणार आहे़.नाशिक जिल्हा पुनर्वसन अधिकारीपदी कार्यरत असताना सोपान कासार यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने दोनदा कारवाई केली होती. लाचखोर असल्यानंतर विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्ती होत नाही़. कुलगुरूनंतर दुसºया क्रमांकाचे महत्वाचे पद असताना अशी नामुष्की पहिल्यांदाच उद्भवली आहे़. कुलसचिवपदासाठी मंत्रालयातून लॉबींग झाली होती, अशी चर्चा विद्यापीठाच्या वर्तुळात अनेकदा झाली होती़. विद्यापीठातील बदल्यांच्या प्रकरणामुळेही फुले विद्यापीठाचे नाव चर्चेत आले होते़.गेल्या आठवडयात कुलसचिव सोपान कासार यांच्यावर राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे कासार यांना अटक होऊ शकते असे सुूत्रांनी सांगितले. त्यामुळे सध्या ते नॉटरिचेबल असल्याचे समोर आले आहे़.कुलसचिव सोपान कासार यांची चौकशी पूर्ण झाली आहे़. तक्रारदारांनी यासंदर्भात पुरावे सादर करून माहिती दिली आहे़. तयार करण्यात आलेला अहवाल सोमवारी (दि.२ मार्च) मंत्रालयात सादर करण्यात आला आहे़. माहिती गोपनीय असल्याने यासंदर्भात अधिक बोलणे सध्या उचित नाही़. यासंदर्भात शासन निर्णय घेईल, असे महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ़हरिहर कौसडीकर यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीuniversityविद्यापीठ