शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सहकार उपनिबंधकाच्या कार्यालयातच महाआघाडीचा ठिय्या : नगर बाजार समितीवर कारवाईची टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 15:22 IST

नगर तालुका महाआघाडीने केलेल्या तक्रारीची चौकशी होवून दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे. चौकशी अहवालात नगर बाजार समितीत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे,

केडगाव : नगर तालुका महाआघाडीने केलेल्या तक्रारीची चौकशी होवून दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे. चौकशी अहवालात नगर बाजार समितीत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे, असे असताना जिल्हा उपनिबंधकांकडून बाजार समितीवर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ महाआघाडीच्या वतीने डीडीआरच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, सभापती रामदास भोर, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, पंचायत समिती सदस्य रविंद्र भापकर, संदीप गुंड, गोरख काळे, अमोल कदम यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कृषि उत्पन्न बाजार समितीने मोकळ्या जागेवर अनधिकृतपणे गाळे उभारले आहेत. तसेच कर्मचा-यांचा पीएफ ही भरलेला नसल्याची तक्रार महाआघाडीने डीडीआरकडे केली होती. तक्रारीवरुन चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. समितीने अहवाल देवून दोन महिने झाले. बाजार समितीने गैरप्रकार केला असल्याचे सिद्ध झाले असताना डीडीआर यांनी कलम ४० अन्वये बाजार समितीला नोटिस देवून खुलासा मागविला आहे. थेट कारवाईचे अधिकार असताना बाजार समितीवर कारवाई केली जात नाही. बाजार समितीवर कारवाई झाल्याशिवाय ठिय्या आंदोलन मागे घेणार नसल्याचे जिल्हा परिषद सदस्य कार्ले यांनी सांगितले.दरम्यान, बाजार समितीने काही प्रॉव्हिडंट फंड भरला असल्याचे सांगितले आहे. परंतु, तो कोणत्या खात्यात भरला आहे. हे डीडीआर यांनी दाखवावे. फंडच भरलेला नसल्यामुळे बाजार समितीवर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाआघाडीकडून करण्यात आली आहे.डिडिआर यांनी चौकशी करून त्याचे पत्र आम्हास दिले आहे. त्यात काही मार्गदर्शक सुचना आहेत. त्या सुचनांची बाजार समिती अमंलबजावणी करणार आहे. तरीही ठिय्या आंदोलन करण्याचा हेतू समजला नाही . - रेश्मा चोभे, उपसभापती, बाजार समितीडिडिआर बाजार समितीमधील गैरव्यवहार पाठिशी घालत आहेत. त्यांच्यात मिलीभगत सुरू असल्याचा संशय आहे. यामुळेच चौकशी होऊनही कारवाई करण्यात व फौजदारी दाखल करण्यात टाळाटाळ होत आहे . - संदेश कार्ले, महाआघाडी

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर