शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
2
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
3
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
6
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
7
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
8
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
9
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
10
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
11
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
12
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
13
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
14
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
15
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
16
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
17
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
18
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
19
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
20
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू

पंधरा वर्षांतील सर्वात कमी पाऊस : जिल्ह्यात टँकरने ओलांडली शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 10:44 IST

गेल्या पंधरा वर्षांतील सर्वात कमी पावसाची नोंद यंदा झाल्याने दुष्काळाची दाहकता जाणवू लागली आहे. त्यामुळे आॅक्टोबरअखेर टँकरने शंभरी ओलांडली असून, प्रशासनाने सुमारे २ लाख लोकांना पाण्याची व्यवस्था केली आहे.

अहमदनगर : गेल्या पंधरा वर्षांतील सर्वात कमी पावसाची नोंद यंदा झाल्याने दुष्काळाची दाहकता जाणवू लागली आहे. त्यामुळे आॅक्टोबरअखेर टँकरने शंभरी ओलांडली असून, प्रशासनाने सुमारे २ लाख लोकांना पाण्याची व्यवस्था केली आहे. अजून हिवाळ्याचे तीन व उन्हाळ्याचे चार असे सात महिने टंचाईचा सामना करायचा असल्याने यंदा टँकरचा उच्चांक नोंदवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.जिल्ह्याच्या पावसाची सरासरी ४९७ मिमी आहे. यंदा जून ते आॅक्टोबरअखेर केवळ ३४५ मिमी (६९ टक्के) पावसाची नोंद झाली. जी गेल्या पंधरा वर्षांतील निचांकी नोंद आहे. याआधी २००३ मध्ये ३०३ मिमी पाऊस झाला होता. त्यानंतर २००४ ते २०१० अशी सात वर्षे जिल्ह्यात ५०० मिमीच्या पुढे पाऊस होऊन सरासरी ओलांडली. पुन्हा २०११, १२, १४ व १५ ही चार वर्षे सरासरीच्या कमी पाऊस झाला. त्यामुळे या चार-पाच वर्षांच्या कालावधीत टँकरची संख्या ३०० ते ५००च्या दरम्यान राहिली. २०१५मध्ये अवघा ३९२ मिमी पाऊस झाल्याने पुढील मे २०१६अखेर प्रचंड टंचाई निर्माण होऊन टँकरची संख्या तब्बल ८२६वर गेली. २०१६ व २०१७मध्ये उच्चांकी ६७८ व ८०३ मिमी पाऊस झाला. त्यामुळे मे २०१७ अखेर अवघे ११४ टँकर सुरू होते. परंतु यंदा भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आॅक्टोबरअखेरच जिल्ह्यात १०१ टँकरने ८५ गावे व ४०१ वाडी-वस्तींच्या सुमारे २ लाख १ हजार ६१ नागरिकांची तहान भागवली जात आहे. पुढील सात महिने पुरेल एवढे पिण्याचे पाणी व जनावरांचा चारा, तसेच दुष्काळी उपाययोजना करताना जिल्हा प्रशासनाची दमछाक होणार आहे.सध्या जिल्ह्यात १०१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जसे प्रस्ताव येतील तसे टँकर मंजूर होत आहेत. सध्याच्या ठेकेदाराची मुदत आॅक्टोबरअखेर संपत आहे. त्यानंतर पुन्हा निविदा काढून टँकरसाठी ठेकेदार निवडले जातील. - जयसिंग भैसडे, नायब तहसीलदार, टंचाई विभाग२०१७ ८०३ ११४ १००

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय