शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक विजेचे दर कमी करणार

By admin | Updated: April 26, 2016 23:27 IST

कोपरगाव : यापुढे महाराष्ट्रात मागेल त्याला वीज जोड देण्याची भूमिका शासनाची आहे़

कोपरगाव : यापुढे महाराष्ट्रात मागेल त्याला वीज जोड देण्याची भूमिका शासनाची आहे़ त्याच बरोबर औद्योगिक क्षेत्रासाठी लागणाऱ्या विजेचे दर कमी करण्याची भूमिका शासनाची असणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली़ कोपरगाव शहरातील उच्च दाब, लघु दाब भूमिगत वाहिनेचे भूमिपूजन तसेच तालुक्यातील कोकमठाण व तळेगाव मळे येथे ३३ केव्हीए विद्युत उपकेंद्राचे भूमिपूजन ऊर्जा मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते झाले़ यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार स्नेहलता कोल्हे होत्या़ संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, नगराध्यक्ष रवींद्र पाठक, सभापती सुनील देवकर, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, तहसीलदार इंदिरा चौधरी, कैलास जाधव, दिलीप दारुणकर आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती़ भूमिगत वाहिनीमुळे जे रस्ते खोदले जातील, ते पुन्हा दुरुस्त करून देण्याचे काम वीज वितरण कंपनी करणार असल्याचे सांगून ऊर्जा मंत्री बावनकुळे म्हणाले, गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात आ़ स्नेहलता कोल्हे यांनी प्रत्येक विभागातून कोपरगाव तालुक्यासाठी निधी उपलब्ध करून घेतला़ कोपरगावच्या जनतेने चांगला लोकप्रतिनिधी निवडला, याबद्दल जनतेचे अभिनंदन केले पाहिजे़ कोपरगाव शहराच्या भूमिगत वाहिनीच्या कामासाठी सध्या तीन कोटी रुपये दिले आहेत, त्यात आणखी सात कोटी रुपये देण्याचे त्यांनी जाहीर केले़ हे काम एकूण ४५ कोटी रुपयांचे आहे़ पुढील निधी टप्प्या- टप्प्याने देवू, चालू पंचवार्षिक नंतर विजेसंदर्भात एकही समस्या राहणार नसल्याची ग्वाही मंत्री बावनकुळे यांनी दिली़ आ़ स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, कोपरगाव शहरात घरगुती व व्यावसायिक वीज ग्राहकांची संख्या १६ हजार ५०० एवढी आहे़ भूमिगत वाहिनीच्या कामाचा शुभारंभ आज झाला़ विजेच्या संदर्भातील तालुक्याचे प्रश्न बावनकुळे सोडवित आहेत़ (प्रतिनिधी)