शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
4
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
5
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
6
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
7
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
8
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
9
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
10
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
11
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
12
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
13
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
14
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
15
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
16
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
17
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
18
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
19
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
20
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल

प्रेयसीच्या घरात प्रियकराचा गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 18:00 IST

प्रेयसीच्या जाचास कंटाळून प्रियकराने तिच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली.

राहुरी : प्रेयसीच्या जाचास कंटाळून प्रियकराने तिच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्या पे्रयसीला अटक केली आहे़ तालुक्यातील मानोरी येथे १५ जून रोजी दुपारी ही घटना घडली़शरद सर्जेराव चव्हाण (वय ३१ रा़ बºहाणपूर ता़ नेवासा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे़ या घटनेनंतर मयताचा भाऊ संतोष उर्फ सतिश सर्जेराव चव्हाण (वय २८) याने येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़ या फिर्यादीत म्हटले आहे की, माझा मयत भाऊ शरद चव्हाण हा शिर्डी-शिंगणापूर रोडवर वाहनचालक म्हणून काम करतो़ शरद याचे गेल्या तीन वर्षांपासून नंदिनी (रा़ मानोरी) नावाच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. सदर मुलीने शरद यांचे विरुध्द पूर्वी अत्याचार केल्याची फिर्याद दाखल केली होती़ त्यानंतर नंदिनी ही आमच्या घरी येऊन आम्हास शिवीगाळ करून बदनामी करत होती. तसेच हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी ती आमच्या कुटुंबीयांकडून दीड लाख रूपयांची मागणी करत होती. तेव्हा माझी आई सरस्वती यांनी सन २०१८ रोजी नंदिनी विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ती माझा मयत भाऊ शरद चव्हाण यास वारंवार फोन करुन त्यास पैशाची मागणी करून सोबत रहा असा आग्रह धरत होती़ तसेच घरी येऊन त्रास देत होती़ या कारणामुळे शरद हा तिचेसोबत शिर्डी येथे तीन वर्षांपासून राहत होता़ तो घरी आला की, नंदिनी मला खूप त्रास देत आहे़ पैशांसाठी आत्महत्या करण्याची धमकी देत आहे, असे सांगत असे़दिनांक १५ जून रोजी दुपारचे सुमारास राहुरी पोलीस ठाणे येथून फोन आला व त्यांनी सांगितले की, तुमचा मुलगा शरद याने मानोरी येथे नंदिनी हिचे मानोरी येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी नंदिनीवर गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे़ याप्रकरणी पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक गणेश शेळके हे पुढील तपास करत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे़प्रेमप्रकरणातून मुलाची आत्महत्याश्रीगोंदा : बांगर्डे येथील अजित शेळके या विद्यार्थ्याने प्रेम प्रकरणातून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १८ एप्रिलला घडली होती. तब्बल महिनाभरानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मयत अजितचे वडील संजय धोंडिबा गायकवाड यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित हा घोगरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकत होता. त्याचे गावातील एका मुलीशी सूत जुळले होते. दीड महिन्यांपूर्वी अजितला मुलीच्या वडिलांनी दमबाजी केली होती. त्यामुळे त्याने घाबरून आत्महत्या केली. त्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस