शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

अगस्ती कारखाना करणार पावणेचार लाख टन उसाचे गाळप

By admin | Updated: October 12, 2016 01:05 IST

अकोले : अगस्ती साखर कारखान्याला कार्यक्षेत्रात ऊस क्षेत्र वाढीसाठी जिल्हा बँक सर्वतोपरी मदत करील, तसेच ‘इथेनॉल’ सहनिमिर्ती प्रकल्प वर्षभरात पूर्ण होईल,

अकोले : अगस्ती साखर कारखान्याला कार्यक्षेत्रात ऊस क्षेत्र वाढीसाठी जिल्हा बँक सर्वतोपरी मदत करील, तसेच ‘इथेनॉल’ सहनिमिर्ती प्रकल्प वर्षभरात पूर्ण होईल, अशी ग्वाही देत या गळीत हंगामात पावणे चार लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचा मनोदय जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी व्यक्त केला.अगस्ती साखर कारखान्याचा २३ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ मंगळवारी विजया दशमीला कळसेश्वर देवस्थानचे सुभाषपुरी महाराज, तसेच योगी केशवबाबा यांच्या हस्ते पार पडला. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकर पिचड होते.गत वर्षी प्रतिकूल परिस्थितीत गळीत हंगाम यशस्वी केला. कार्यक्षेत्रात ऊसवाढीसाठी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ प्रयत्न करत आहेत. कार्यक्षेत्रात पावणे दोन लाख मेट्रिक टन ऊस असून, कार्यक्षेत्राबाहेरील उसाच्या बळावर यंदा किमान साडेतीन ते पावणे चार लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचा आराखडा तयार आहे. १३ संचालकांनी आपल्या डोक्यावर वैयक्तिक कर्ज घेऊन कारखान्याची चिमणी पेटती ठेवल्याचे कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर यांनी स्पष्ट केले. ऊसउत्पादक शेतकरी व कामगारांनी २३वा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखाना प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन माजी मंत्री पिचड यांनी केले. आमदार वैभव पिचड, जेष्ठ नेते लक्ष्मण शिंदे, झुंबरराव आरोटे, जे. डी. आंबरे, यशवंत आभाळे, पंचायत समिती सभापती अंजना बोंबले, परबत नाईकवाडी, गोरक्ष मालुंजकर, मीनानाथ पांडे, शिवाजी हासे, सुभाष देशमुख, कार्यकारी संचालक भास्कर घुले, शिवाजी कोठवळ आदींसह सर्व संचालक उपस्थित होते.संचालक मच्छिंद्र धुमाळ, बाळासाहेब देशमुख, सुरेश गडाख, भास्कर बिन्नर, सुनील दातीर, संचालिका मनीषा येवले यांनी व राजकुमार पवार यांनी बॉयलरचे पूजन केले. एकनाथ शेळके यांनी सुत्रसंचालन करत उपस्थितांचे आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)