शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नेवासा फाट्यावर कापसाच्या व्यापाऱ्याला लुटले, ९ लाखांच्या गाडीसह ४ लाखांची रोख रक्कम पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 23:30 IST

नेवासा फाटा येथे रविवार रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान पोलीस असल्याचे भासवून व्यापाऱ्याची ९ लाख रुपयांची गाडी व रोख रक्कम ४ लाख रुपये असा एकूण १३ लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला

नेवासा (जि. अहमदनगर) : नेवासा फाटा येथे रविवार रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान पोलीस असल्याचे भासवून व्यापाऱ्याची ९ लाख रुपयांची गाडी व रोख रक्कम ४ लाख रुपये असा एकूण १३ लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला. व्यापाऱ्याला लुटण्याची घटना याबाबत सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.     याबाबत नेवासा पोलिसांत व्यापारी युनूस बुगण शेख रा. वळण राहुरी यांनी फिर्याद दिली. त्यानुसार  रविवार दि.१० डिसेंबर रोजी नेवासा भागातील कापूस व्यापाऱ्यांना देण्यासाठी    मारुती गाडी  व्हिटारा ब्रिझा (क्रमांक एमएच १७ बिव्ही १३५२) यामध्ये ५ लाख रुपये घेऊन शेख आले होते. नेवासा खुर्द भागातील व्यापारी विजय राशीनकर यांच्याकडे त्यांची कापसाची गाडी भरत होती. मात्र कापूस कमी पडल्याने उस्थळ दुमाला येथील दुसरे व्यापारी रामेश्वर दिगंबर सिदलंबे यांच्याकडे जाऊन कापसाची बोलणी करून कापसापोटी त्यांना १ लाख रुपये दिले. नेवासा फाटा येथून नेवासाकडे येण्यासाठी निघालो असता रस्त्याच्या कडेला खाकी पॅन्ट,पांढरा शर्ट व जर्किंग तसेच डोक्यात हेल्मेट घालून मोटार सायकलवर बसलेल्या एका इसमाने गाडीला हात करून बाजूला लावण्याचा इशारा करून थांबण्यास सांगितले. त्यांच्या अंगातील कपड्यावरून वाहतूक पोलिस असल्याचे वाटल्याने गाडीचा वेग कमी केला, मात्र त्याच्या जवळ जात असताना हा पोलीस नसावा असा अंदाज आल्याने गाडीचा वेग पुन्हा वाढविला. त्यानंतर या इसमाने मोटारसायकल क्रमांक एमएच १९ एएस १५५३ या वरून पाठलाग करून गाडी बाजूला लावायला सांगितले. गाडी चालवताना फोनवर बोलतो असे म्हणत गाडीच्या मागे दुचाकी लावून मला बोलवत लायसन्स व कागदपत्राची मागणी केली असता. मी कागदपत्र असल्याचे सांगितले परंतु लायसन्स नाही असे सांगताच गाडी पोलीस ठाण्यात न्यावी लागेल असे सांगत हेल्मेट काढून खिशातील पोलीस टोपी माझ्या गाडीत टाकून स्वतः ड्रायव्हर शीटवर बसून मला मोटारसायकल मागे घे व तू पलीकडून येऊन गाडीत बस असे सांगितले मी मागे गेलो असता तो गाडी घेऊन भरधाव वेगाने नेवाशाच्या दिशेने निघून गेला. गाडीची किंमत ९ लाख तसेच ४ लाख रुपये रोख असा एकूण १३ लाख रुपयांची लूट झाली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.अधिक तपास नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे हे करत आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणे पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.