शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डीमध्ये खरेदी विक्री संघाच्या पेट्रोल पंपावर ग्राहकांची लूट : उशीराने दर कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 10:44 IST

तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने शहरातील कोरडगाव रोडवर चालवण्यात येणा-या इंडिअन आॅईल कंपनीच्या पंपावर आज सकाळपर्यत दर कमी करण्यात आले नव्हते

पाथर्डी : तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने शहरातील कोरडगाव रोडवर चालवण्यात येणा-या इंडिअन आॅईल कंपनीच्या पंपावर आज सकाळपर्यत दर कमी करण्यात आले नव्हते. त्यामुळे या पंपावर ग्राहकांची लूट सर्रासपणे सुरुच होती. गुरुवारी मध्यरात्रीपासून शासनाने पेट्रोल पाच रुपये आणि डीझेलचे दर अडीच रूपयाने कमी केले असतानाही आज सकाळी ९ वाजेपर्यंत दर कमी करण्यात आले नव्हते. याबाबत ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याची तक्रार खरेदी विक्री संघाचे माजी संचालक सीताराम बोरुडे यांनी इंडिअन आॅईल कंपनीकडे केली आहे.केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर अडीच रुपयांची कमी केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातही पेट्रोल पाच तर डीझेल अडीच रुपयांनी गुरुवारी कमी करण्यात आले. हा निर्णय झाल्याबरोबर संबधित पेट्रोल वितरीत करणा-या पेट्रोल कंपन्या, त्या अंतर्गत येणारे पेट्रोल पंपांनी इंधनाचे दर कमी करणे बंधनकारक होते. परंतु पाथर्डी तालुका खरेदी विक्री संघाच्या अंतर्गत चालवण्यात येणा-या इंडियन आॅईल कंपनीच्या पंपावर आज सकाळी ९ वाजेपर्यंत पूर्वीच्याच दराने पेट्रोल प्रतिलीटरला ९१ रुपये ५० पैसे तर डिझेल ७९ रुपयांप्रमाणे दर आकारणी ग्राहकाकडून करण्यात येत होती. याबाबत खरेदी विक्री संघाचे माजी संचालक तथा राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोरुडे यांनी इंधनाचे दर कमी होवूनही पंपचालकाकडून ग्राहकांची लूट होत असल्याबाबत पंप चालकास धारेवर धरले. इंधनाचे दर कमी होवूनही अनेक ग्राहकांना पूर्वीच्याच दराने विक्री होत असल्याचे लक्षात येताच इतरही ग्राहकांनी पंपचालकाविरुद्ध तक्रारीचा पाढा वाचला मात्र पंपाचे व्यवस्थापक विभाकर बारवकर हे पंपावर आलेच नाही. पूर्वीच्या दराने इंधन खरेदी करण्यास ग्राहक तयार नसल्याने साडे आठ वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत पंपावर ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती.‘‘खरेदी विक्री संघाच्या पंपावरून छुप्या रीतीने ग्राहकांची लुट केली जात आहे. याबाबत कंपनी कडे तक्रार केली आहे.’’- सीताराम बोरुडे, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी जिल्हा‘‘इंधन दर कपाती बाबत इंधन कंपनीकडून विभाग प्रमुखांना सकाळी उशीरा संदेश आला. त्यामुळे उशिराने दर कमी केले’’ -विभाकर बारवकर, व्यवस्थापक‘‘दर कपात झाल्याने रात्री बारा वाजता दर कमी करणे अपेक्षित होते. याबाबत व्यवस्थापक बारवकर यांना सांगितले होते. परंतु सकाळी दर कपात केले आहेत’’ - दत्तात्रय शिरसाठ, विभाग प्रमुख

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी