शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेसाठी कळमकर, घुले, ढाकणे इच्छुक :शरद पवार यांच्याकडून आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 15:30 IST

नगर दक्षिण लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार दादा कळमकर, नरेंद्र घुले, अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

अहमदनगर : नगर दक्षिण लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार दादा कळमकर, नरेंद्र घुले, अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुंबई येथे शनिवारी सकाळी झालेल्या बैठकीत या तिघांनीही शरद पवार यांच्याकडे ही इच्छा व्यक्त केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी मुंबई येथे सकाळी बैठक झाली. या बैठकीला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे हे उपस्थित होते. या बैठकीला जिल्ह्यातून आ. राहुल जगताप, माजी आ. चंद्रशेखर घुले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, उदय शेळके, प्रशांत गायकवाड, माजी महापौर अभिषेक कळमकर उपस्थित होते.या बैठकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा सुरवातीला आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातून या बैठकीसाठी मोजक्याच नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते. या पूर्वी झालेल्या बैठकीत आ. अरुण जगताप यांचे नाव चर्चेत आले होते. परंतु महापालिका निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्याने त्यांना या बैठकीचा निरोपही नव्हता. शहरातून दादा कळमकर यांनी नगर दक्षिणेतून उमेदवारी करण्याची इच्छा पक्षाकडे व्यक्त केली आहे. जगताप यांचा पत्ता कट झाल्याने कळमकर यांचा पक्ष विचार करणार का? याकडे लक्ष लागले आहे.शेवगावचे माजी आमदार नरेंद्र घुले यांनीही उमेदवारी करण्याबाबत बैठकीत तयारी दर्शविली आहे. त्यांचे बंधू चंद्रशेखर घुले गतवेळी विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यांनी शेवगाव-पाथर्डीतून विधानसभेची तयारी सुरू केली आहे. बंधू नरेंद्र घुले यांना लोकसभेच्या मैदानात उतरविण्यासाठी चंद्रशेखर घुलेही तयारीत आहेत.अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी मागील बैठकीतही आपण इच्छुक असल्याचे सांगितले होते. या बैठकीतही त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. या तीन नेत्यांपैकी की आणखी कोणाची उमेदवारी जाहीर होते, हे आगामी काळातच स्पष्ट होईल.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर