शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

व्हॉट्सअ‍ॅपवरून ग्रामसेवकांवर नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 12:39 IST

प्रशासकीय बैैठकांच्या नावाखाली ग्रामपंचायतीत सातत्याने गैरहजर राहणाऱ्या कामचुकार ग्रामसेवकांविरोधात सरपंचांनी तक्रारीचा पाढा वाचला.

ठळक मुद्दे सरपंचांचा आरोप : बैठकांच्या नावाखाली दांडी, कामकाजाचा आता आॅनलाइन आढावा

शिवाजी पवारश्रीरामपूर : प्रशासकीय बैैठकांच्या नावाखाली ग्रामपंचायतीत सातत्याने गैरहजर राहणाऱ्या कामचुकार ग्रामसेवकांविरोधात सरपंचांनी तक्रारीचा पाढा वाचला. अखेर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून ग्रामसेवकांच्या कामाचा नियमित आढावा सरपंच महाशयांना सादर करण्याचा निर्णय पंचायत समिती स्तरावर घेण्यात आला. आता दोघांमध्ये हरवलेला समन्वय पुन्हा स्थापित करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.श्रीरामपूर पंचायत समितीत सोमवारी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यात समन्वय घडवून आणण्याकरिता महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. सभापती दीपक पटारे, उपसभापती बाळासाहेब तोरणे, गटविकास अधिकारी मोहन जाधव, सहायक गटविकास अधिकारी सुखदेव काळोखे यांच्यासह तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक बैठकीला उपस्थित होते. बैठकीत अनेक सरपंचांनी ग्रामसेवकाविरुद्ध तक्रारींचा पाढा वाचला.ग्रामसेवकांना पंचायत समिती, तहसील कार्यालय, जिल्हा परिषदेशी संबंधित कामकाजाच्या आठवड्यात दोन ते तीन बैैठका असतात. त्यातच दोन शनिवारच्या सुट्ट्या हमखास मिळाल्या आहेत. चार रविवारांचा समावेश करता ग्रामसेवक उपलब्धच होत नसल्याची तक्रार सरपंचांनी केली. बैठकीच्या नावाखाली ग्रामसेवक तालुक्याला जातात. मात्र अनेकदा अशी कुठलीही बैैठकच आयोजित केलेली नसल्याचे समजते. त्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, ग्रामसेवकांच्या तहसील, पंचायत समिती, तसेच जिल्हा परिषदेमध्ये होणाºया बैैठकांबाबत सरपंचांना तालुक्याला होणाºया बैैठकांची कल्पना दिली जाणार आहे. त्याबाबतचा तपशीलदेखील उपलब्ध करून दिला जाणार आहे.एकतर ग्रामसेवकांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहायला हवे. आमचे ग्रामसेवक आठवड्यातून एक-दिवस गावात येतात. वसुलीची कामे ठप्प झाली आहेत. दलित वस्तीतील कामे ठप्प असून, मुदत संपत आली असताना ऐनवेळी प्रस्ताव तयार करण्याची सूचना ग्रामसेवकाने दिली. ग्रामसेवक मुरब्बी असतात व त्यातही संघटित आहेत. संपूर्ण गावाचा गाडा हाकण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मात्र मी जेरीस आलो आहे. त्यांच्या बदलीचे अधिकार मला दिले जावेत.-प्रभाकर कांबळे, सरपंच, खिर्डी ग्रामपंचायत.पंचायत समिती स्तरावर पंधरवड्याला बैठक असते. याशिवाय घरकुल व शौचालयांसंबंधी जिल्हा परिषदेतही बैठकांना उपस्थित राहावे लागते. कृषी विभागाकडून पीककापणी प्रयोग व इतर कामांचा तगादा असतोच. बीएलओच्या कामांमुळे तहसील कार्यालयातही हेलपाटे सुरू असतात. एवढे करूनही आम्ही सुट्टीच्या दिवशी ग्रामपंचायतीत कामे करतो. कामचुकारपणा करणारे एखाद-दुसरे अपवाद असतात. मात्र तो नियम नाही.-आर. एफ. जाधव, ग्रामसेवक, टाकळीभान.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर