शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोकनेते राजीव राजळे यांच्या निधनाने पाथर्डी तालुक्यावर शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 12:00 IST

पाथर्डी / तिसगाव (अहमदनगर) : शनिवारी रात्री लोकनेते माजी आमदार राजीव राजळे (वय ४८) यांचे मुंबई येथे उपचारा दरम्यान ...

पाथर्डी / तिसगाव (अहमदनगर) : शनिवारी रात्री लोकनेते माजी आमदार राजीव राजळे (वय ४८) यांचे मुंबई येथे उपचारा दरम्यान निधन झाले. त्यामुळे पाथर्डी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. रविवारी सकाळी ८ वाजता त्यांचे पार्थिव कासार पिंपळ्गाव येथे सिद्धसावली या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.राजळे हे काही दिवसांपासून न्युमोनियामुळे आजारी होते़ नगर येथे उपचार सुरु असतानाच त्यांच्या फुप्फुसात संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांना तातडीने मुंबई येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील माजी आमदार अप्पासाहेब राजळे, आई मोहिनी राजळे, पत्नी आमदार मोनिका राजळे, दोन मुले व एक बंधू राहूल असा परिवार आहे.रविवारी सकाळी त्यांचे पार्थिव कासार पिंपळगाव येथे आणण्यात आले. रुग्णवाहिकेसोबत राजीव राजळे यांच्या पत्नी तथा आमदार मोनिका राजळे, राजाभाऊच्या भगिनी सुनीता गडाख, संगीता जगदाळे, राहुल राजळे, गुलाब राजळे हे होते. पार्थिव असलेली रुग्णवाहिका प्रवेशद्वारात येताच राजीव राजळे यांच्या आई मोहिनीकाकी यांचा बांध फुटला. त्यांच्यासह सर्वच नातेवाईकांना अश्रू अनावर झाले़ त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जिल्हाभरातील त्यांचे कार्यकर्ते कासार पिंपळगाव येथे दाखल झाले आहेत. अंत्यविधीची तयारी जवळच असलेल्या दादा पाटील राजळे महाविद्यालयाच्या मैदानावर सुरु आहे. राज्य शासनातील मंत्री, अधिकारी यांची उपस्थिती गृहीत धरून मोठा शामियाना, हेलिपॅड, वाहन पार्किंग व पूरक व्यवस्था उभारण्याचे काम सुरु आहे़ ४़३० वाजता अंत्यविधी होणार आहे. दरम्यान पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील अनेक गावे आज बंद आहेत. लाडक्या नेत्याच्या शोकसागरात बुडालेल्या अनेक शेतक-यांनी आज दूधही डेअरीवर नेले नाही़ काही डेअरी संचालकांनी संकलन बंद ठेवले.

   २००४ ते २००९ या कालावधीत आमदार

  • राजीव राजळे हे २००४ ते २००९ या कालावधीत पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून काँगे्रसचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. २००९ मध्ये अहमदनगर (दक्षिण) मतदारसंघातून त्यांनी लोकसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविली होती. त्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये याच मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून लोकसभेची निवडणूक लढविली होती. २०१४ च्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी मोनिका राजळे या भाजपच्या तिकिटावर शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.

     आदर्श संसदपटू

  • राजळे हे अभ्यासू आमदार म्हणून ओळखले जात. विधानसभेत त्यांनी अर्थसंकल्पावर केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणांची मोठी चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांना विधानसभेने आदर्श संसदपटू पुरस्कार देऊन गौरविले होते.