शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत महामॅरेथॉन : अल्ट्रा रनर आदित्य सोनवणे आज नगरमधून धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 12:09 IST

लोकमत महामॅरेथॉनच्या जनजागृतीसाठी मुंबईचा अल्ट्रा रनर आदित्य सोनवणे बुधवारी (दि़२१) नगरमधून धावणार आहे.

अहमदनगर : लोकमत महामॅरेथॉनच्या जनजागृतीसाठी मुंबईचा अल्ट्रा रनर आदित्य सोनवणे बुधवारी (दि़२१) नगरमधून धावणार आहे. जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताच आदित्य याचे विविध ठिकाणी स्वागत उत्साहात होऊन नगरमधील विविध ग्रुप त्याच्यासोबत धावणार आहेत.रनिंग संस्कृतीचा प्रसार व्हावा आणि लोकमत महामॅरेथॉनची नागरिक, धावपटुंमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने आदित्य सोनवणे पुणे ते औरंगाबाद असे २४० किलोमीटर धावणार आहे. आदित्य याने मंगळवारी (दि़२०) पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून रनसाठी प्रारंभ केला आहे. आदित्य हा बुधवारी सकाळी ८ वाजता जिल्ह्यातील सुपा येथे पोहोचणार आहे. तेथे स्वागत झाल्यानंतर माळीवाडा बसस्थानकाजवळील नमो उद्योग समूहाजवळ त्याचे नगर रायझिंग रनर्स ग्रुपतर्फे स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी डॉ़ सतीश सोनवणे, डॉ़ शाम तारडे, संदीप जोशी, निर्मल थोरात, गौतम जायभाय यांच्यासह शहरातील खेळाडू व क्रीडापे्रमी उपस्थित राहणार आहेत. यावेळी आदित्य हा उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे़ त्यानंतर आदित्य यांच्यासोबत नगर-औरंगाबाद रोडने हॉटेल इंद्रायणीपर्यंत एकलव्य क्रीडा मंडळाचे खेळाडू धावणार आहेत. जेऊर येथे मुक्काम केल्यानंतर आदित्य हा गुरूवारी सकाळी औरंगाबादच्या दिशेने प्रयाण करणार आहे. गुरूवारी रात्री साडेदहा वाजता औरंगाबाद येथील लोकमत भवन येथे आदित्य याचे स्वागत होणार आहे. निरोगी आरोग्यासाठी आदित्य सोनवणे यांच्यासोबत नगरकरांनी रन करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर