शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत एज्युकेशन फेअर २०१९’चे शानदार उद्घाटन, शैक्षणिक माहिती एका छताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 18:02 IST

दहावी, बारावीनंतर काय करावे, स्पर्धेच्या युगात कोणत्या क्षेत्रात करिअर करावे? असे एक ना अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांसमोर असतात़ ‘

अहमदनगर: दहावी, बारावीनंतर काय करावे, स्पर्धेच्या युगात कोणत्या क्षेत्रात करिअर करावे? असे एक ना अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांसमोर असतात़ ‘लोकमत’च्या शैक्षणिक प्रदर्शनाच्या माध्यमातून मात्र या सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच छताखाली मिळणार असून, हे एज्युकेशन फेअर विद्यार्थी आणि पालकांसाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास शिक्षण तज्ज्ञ आणि माजी कुलगुरू डॉ़ सर्जेराव निमसे यांनी व्यक्त केला़‘लोकमत एज्युकेशन फेअर २०१९’ चे शुक्रवारी (दि़३१) शहरातील प्रेमदान चौकातील गायकावाड सांस्कृतिक भवन येथे मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले़ यावेळी निमसे बोलत होते़ कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, विखे फौंडेशनचे उपसंचालक प्रा़ सुनील कल्हापुरे, विखे फौंडेशनच्या फार्मसी कॉलेजचे प्राचार्य प्रा़ बी़ वाय़ पवार, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य उदय नाईक, युनिक अ‍ॅकॅडमीचे संचालक गोपाल सैंदाने, स्टेट बँक आॅफ इंडियाचे मार्केटिंग मॅनेजर महेश साटम, अमेटी विद्यापीठाचे डॉ़ पंकज पांडे, डॉ़ स्वप्निल ताथेड, लोकमतचे उपसरव्यवस्थापक नरेंद्र अंकुश, आवृत्तीप्रमुख सुधीर लंके यांच्यासह शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते़डॉ़ निमसे म्हणाले जगात सर्वात जास्त उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था भारतात आहेत़ उच्च शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे़ एकेकाळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक पर्याय खूप कमी होते़ आता पर्याच वाढले आहेत़ बदलत्या काळात शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे़ नगर जिल्हा आणि परिसरातील शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण दिले तर नगर हे शैक्षणिक हब होईल असा विश्वास निमसे यांनी व्यक्त केला़ प्रास्ताविकात सुधीर लंके महणाले दहावी-बारावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक दिशा मिळावी, या उद्देशाने लोकमतच्यावतीने दरवर्षी शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते़योग्य मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल: संग्राम जगतापशैक्षणिक क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत़ अशा परिस्थतीत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे़ लोकमतच्या शैक्षणिक प्रदर्शनातून हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांना मिळणार आहे़ अनेक संस्थांचे स्टॉल एकाच ठिकाणी असल्याने यातून विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे़ नगर जिल्ह्यात दर्जेदार शिक्षण संस्था आहेत़ याचा लाभ विद्यार्थी आणि पालकांना घेता येणार आहे़ असे शैक्षणिक प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी आहेत असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले़शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार: महापौर बाबासाहेब वाकळेदर्जेदार शिक्षणातून भावी पिढीचे उज्वल भविष्य घडत असते़ स्थानिक ठिकाणी विद्यार्थ्यांना अपेक्षित शैक्षणिक सुविधा मिळाल्या तर विद्यार्थ्यांसह त्या शहराचाही विकास होतो़ नगर शहरात दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महापालिकेच्या माध्यमातून येणाºया काळात प्रयत्न करणार आहे़ विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठीही पाठपुरावा करणार आहे़ लोकमतचे शैक्षणिक प्रदर्शन कोतुकास्पद उपक्रम आहे असे मत महापौर बाबासाहेब वाकळे यांनी व्यक्त केले़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLokmatलोकमत