शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

Lok Sabha Election 2019 : तरूण ठरवणार भावी खासदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 16:27 IST

तरूणांची सर्वात जास्त लोकसंख्या असलेला भारत हा जगातील एकमेव देश असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने एका अहवालात म्हटले आहे.

चंद्रकांत शेळके अहमदनगर : तरूणांची सर्वात जास्त लोकसंख्या असलेला भारत हा जगातील एकमेव देश असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने एका अहवालात म्हटले आहे. सध्या अहमदनगर जिल्ह्याची मतदारसंख्या पाहता त्यावर शिक्कामोर्तबच होते. कारण जिल्ह्याच्या एकूण ३४ लाख मतदारांपैकी १५ लाख मतदार (४५ टक्के) हे तरूण आहेत. विशेष म्हणजे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातही दोन तरूण उमेदवारांतच लढत होत आहे. त्यामुळे तरुणांची मते कोणाच्या पारड्यात पडणार ते निकालानंतर स्पष्ट होईल.अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी व अहमदनगर हे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. शिर्डी मतदारसंघात अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो, तर अहमदनगर मतदारसंघात शेवगाव, राहुरी, पारनेर, अहमदनगर शहर, श्रीगोंदा व कर्जत-जामखेड असे सहाच विधानसभा मतदारसंघ आहेत. जिल्ह्यात एकूण ३३ लाख ९३ हजार मतदार असून त्यात १७ लाख ७१ हजार पुरूष,तर १६ लाख २१ हजार स्त्री मतदार आहेत. यातही शिर्डी मतदारसंघात एकूण १५ लाख ६१ हजार, तर अहमदनगर मतदारसंघात १८ लाख ३१ हजार मतदार आहेत. या सर्वच मतदारसंघांत तरूण मतदारांची संख्या जास्त आहे.अहमदनगर लोकसभेसाठी भाजपकडून सुजय विखे, तर राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप या दोन तरूणांत ‘टशन’ होणार आहे. हे दोन्ही उमेदवार पस्तीशीतील आहेत. त्यामुळे या मतदारसंघात तरूणांचा उत्साह पहायला मिळतो आहे. दोन्ही उमेदवारांच्या सभेलाही तरूणाईच ‘चिअर’ करताना नजरेस पडते. ‘तरूणाई निवडणुकीपासून बाजूला असते’, असा कथित आरोप या मतदारसंघात सध्यातरी लागू नाही. मतदारयादीवर नजर फिरवली तर तब्बल १५ लाख मतदार चाळिशीच्या आतील आहेत. त्यातही सर्वाधिक सुमारे साडेसात लाख मतदार ३० ते ३९ वयोगटातील आहेत. त्यानंतर २० ते २९ वयोगटात सात लाख मतदारांची नोंदणी आहे. याशिवाय ६८ हजार नवमतदार १८ ते १९ या वयोगटातील आहेत.असे हे तरूणच दोन्ही मतदारसंघांत महत्त्वाची भूमिका बजावून आगामी दोन्ही खासदारांसाठी दिल्लीचे दरवाजे उघडणार आहेत.तालुकानिहाय तरूण मतदारांची संख्या - शेवगावमध्ये सर्वाधिक तरूणअकोले 114028संगमनेर 120499शिर्डी 119424कोपरगाव 121166श्रीरामपूर 127808नेवासा 113714शेवगाव 151229राहुरी 127159पारनेर 138888अ.नगर शहर 126161श्रीगोंदा 133724कर्जत-जामखेड 135726१९५१ मतदार शंभरी पारएकूण ३४ लाख मतदारांमध्ये १९५१ मतदार शंभरी पार केलेले (शतायुषी) आहेत. याशिवाय ९० ते ९९ या वयोगटात १६ हजार ७५ मतदारांचा समावेश आहे. ८० ते ८९ या वयोगटात ९५ हजार ३९९, ७० ते ७९ वयोगटात २ लाख १ हजार ९१२, तर ६० ते ६९ वयोगटात ३ लाख ४० हजार ५८० मतदार आहेत. असे एकूण ६ लाख ५५ हजार ९१७ मतदारांनी साठी ओलांडलेली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर