शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : तुम्ही बरोबर आहात... चिंता नाही : पुत्रासाठी राधाकृष्ण विखे यांची मतदारसंघामध्ये फिल्डींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 13:52 IST

‘मी काय बोलतो हे टिपण्यासाठी माझ्या चारहीबाजूंनी कॅमेरे आहेत. त्यामुळे मी फक्त तुमची भेट घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही बरोबर आहात. त्यामुळे मला चिंता नाही,

श्रीगोंदा :‘मी काय बोलतो हे टिपण्यासाठी माझ्या चारहीबाजूंनी कॅमेरे आहेत. त्यामुळे मी फक्त तुमची भेट घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही बरोबर आहात. त्यामुळे मला चिंता नाही, असे मार्गदर्शन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना करत आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील दौरा करत असून पुत्र डॉ. सुजय विखे यांच्यासाठी बांधणी करत असल्याचे दिसून येत आहे.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आज श्रीगोंदा तालुक्याचा दौरा करत असून आपल्या समर्थकांना अलर्ट राहण्याचा संदेश देत आहेत. विखेंच्या दौ-यात भाजपासह काँग्रेसचे कार्यकर्ते ही सहभागी होत आहेत. पुत्र डॉ. सुजय विखे यांची भाजपाकडून उमेदवारी निश्चित मानली जात असल्याने त्यांनी मतदारसंघात दौरा सुरु केला आहे.श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव, घारगाव, बेलवंडी गावात त्यांनी बैठक घेतल्या. बेलवंडीमध्ये काँग्रेसचे मावळते जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अनील वीर यांनी ही लढाई विखे विरूध्द पवार अशी असल्याने आपल्याला विखे पाटलांच्या मागे उभे राहावे लागेल, असे सांगितले. अण्णासाहेब शेलार म्हणाले, राधाकृष्ण विखे पाटील हे मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून काँग्रेसमधील काही नेत्यांनी हे षडयंत्र रचले आहे. आमचा विखे हाच पक्ष आहे. बाबासाहेब नाहाटा यांनीही यावेळी विचार मांडले. काष्टीत साईसेवा पतसंस्थेत सदाशिव पाचपुते यांचीही भेट त्यांनी घेतली. कैलास पाचपुते यांची निवासस्थानी भेट घेतली. काष्टी सहकारी सोसायटीत भगवानराव पाचपुते समर्थकांबरोबर संवाद साधला. बेलवंडीत दिलीप रासकर यांची भेट घेतली. जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, विठ्ठलराव काकडे, बाळासाहेब गिरमकर, सिध्देश्वर देशमुख, संतोष रोडे, सचिन कोकाटे, सुनील महाडीक उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९