शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : राधाकृष्ण विखे- शिवाजी कर्डिले यांचा सोबत प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 10:02 IST

आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासमवेत बारागाव नांदूर ते राहुरी असा एका वाहनातून प्रवास करण्याचा योग जुळवून आणताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी कर्डिले यांच्याशी राजकीय खलबते केली.

राहुरी : आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासमवेत बारागाव नांदूर ते राहुरी असा एका वाहनातून प्रवास करण्याचा योग जुळवून आणताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी कर्डिले यांच्याशी राजकीय खलबते केली.यानंतर दोघांनीही राहुरीत सुजय विखे यांच्यासाठी मोर्चेबांधणी केली. राहुरी येथे पोहोचल्यानंतर तालुका काँग्रेस आयचे अध्यक्ष रावसाहेब तनपुरे यांच्या निवासस्थानी जाऊन विखे-कर्डिले यांनी राहुरी शहरातील ३६ बुथचा आढावा घेतला़ विविध समाजातील नागरिकांशी चर्चा करून दक्षिण नगर मतदारसंघात भाजप उमेदवार डॉ़ सुजय विखे यांच्यासाठी बांधणी केली़बारागाव नांदूर येथे जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव गाडे यांचा दशक्रिया विधी होता़ यावेळी काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात हेही उपस्थित होते़ श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर ते पुढील कार्यक्रमासाठी गेले़ कार्यक्रमानंतर राधाकृष्ण विखे हे गर्दीत आमदार शिवाजी कर्डिले यांची प्रतीक्षा करीत होते़ आमदार कर्डिले येताना दिसताच त्यांना स्वत:च्या गाडीत घेऊन राहुरीच्या दिशेने प्रवास केला़प्रवासात विखे-कर्डिले यांच्यात राहुरी मतदार संघातील सद्य:परिस्थितीबाबत चर्चा झाल्याचे समजते़ राहुरीतून अधिक मताधिक्य मिळण्यासाठी दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यानंतर विखे-कर्डिले यांनी राहुरीतील काँगे्रसचे तालुकाध्यक्ष रावसाहेब तनपुरे यांचे निवासस्थान गाठले़ तेथे राहुरी शहरातील विविध समाजातील मतदारांशी विखेंनी संवाद साधला़ राहुरी शहरातील परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला़विखे-कर्डिलेंसमवेत अ‍ॅड़ सुभाष पाटील, जिल्हा शिवसेनाप्रमुख रावसाहेब खेवरे, तनपुरे कारखान्याचे संचालक विजय डौले, सुरसिंग पवार, डॉ़ संजय भळगट, डॉ़ धनंजय मेहेत्रे, सुभाष वराळे, बापू वराळे, प्रमोद सुराणा, गोपाळ अग्रवाल, दिलीप राका, अण्णासाहेब शेटे, सोन्याबापू जगधने, अरूण साळवे, विलास साळवे, दीपक मेहेत्रे आदी उपस्थित होते़साडेचार तास विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी आढावा बैठक घेतली़ यानिमित्त ९०० जणांशी संवाद साधला़ राधाकृष्ण विखे हे राष्ट्रवादीवर नाराज आहेत़ त्यामुळे त्यांनी आता थेट सुजय यांच्यासाठी बांधणी सुरु केली आहे़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019