शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019: अहमदनगरमध्ये खासदार पुत्र सुवेंद्र गांधी यांची निवडणुकीत माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 20:34 IST

भाजपाने खासदार दिलीप गांधी यांना तिकिट नाकारल्यानंतर पुत्र सुवेंद्र गांधी यांनी बंड पुकारले होते. निवडणुकीत उतरण्यासाठी त्यांनी तयारी केली होती

अहमदनगर : भाजपाने खासदार दिलीप गांधी यांना तिकिट नाकारल्यानंतर पुत्र सुवेंद्र गांधी यांनी बंड पुकारले होते. निवडणुकीत उतरण्यासाठी त्यांनी तयारी केली होती. मात्र आज निवडणुकीतून माघार घेत असल्याची भुमिका त्यांनी जाहीर केली. वडील खासदार दिलीप गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचेही सुवेंद्र गांधी यांनी सांगितले.

अहमदनगर लोकसभा मतदारंसघात भाजपने डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी दिल्यानंतर खासदार दिलीप गांधी नाराज झाले होते. गांधी समर्थकांनी मेळावा घेत अपक्ष निवडणुक लढविण्याची तयारी केली होती. त्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांनी गांधी परिवाराची भेट घेतली होती. त्यानंतरही खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांच्यासाठी अविनाश साखला यांनी उमेदवारी अर्ज नेला होता. या सर्व हालचालीनंतर सुवेंद्र गांधी यांनी निवडणुकीत माघार घेण्याची भुमिका जाहीर केली. त्यामुळे आता अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे डॉ.सुजय विखे विरूध्द राष्ट्रवादीचे संग्राम जगताप अशी दुहेरी लढत रंगणार आहे.

 

मी भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ता आहे . त्यामुळे अनेक पदांवर काम करता आले. वडील खासदार दिलीप गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात व जिल्ह्यात पक्षाचे काम केली. मात्र 1999 गांधींना जिल्हाध्यक्षपदासाठी डावलले, 1996 ला लोकसभेसाठी डावलले,  1999 नाही मोठा संघर्ष केल्याने भारतीय जनता पार्टी चे तिकीट मिळाले व लोकसभे च्या निवडणुकीत दिलीप गांधी विजयी झालले. मात्र परत 2004 ला लोकसभेचे तिकीट कापले. असा सतत्याने दिलीप गांधींवर पक्षाकडून अन्याय झाला असला तरी खासदार दिलीप गांधी यांनी पक्षनिष्ठा कणभरही कमी केली नाही .शहरात व जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष काढून पक्षाला सुवर्ण दिवस आणले . शहर जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष म्हणून गेल्या तीन वर्षात सर्वात जास्त उपक्रम राबवले.  मतदारसंघाच्या विकासासाठी ही केंद्र सरकारकडून हजारो कोटी रुपयांच्या विकास निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामास प्रारंभ केला . पक्षाने सांगितले व दिलेले सर्व कार्यक्रम प्रभावीपणे राबविले तरीही आताच्या लोकसभेसाठी खासदार गांधींचे तिकीट कापून अन्याय केला. असे असतानाही 24 फेब्रुवारी रोजी झालेल्या मेळाव्यात मी भारतीय जनता पार्टीचे काम करणार व पक्षाचा उमेदवार विजयी करणार असे मेळाव्यात घोषणाही केली होती. तरीही भाजपाचे उमेदवाराकडून वरिष्ठ खासदार म्हणून अद्याप उचित सन्मान मिळाला नाही. म्हणून मी लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी करणार असे जाहीर केले होते. मात्र, दरम्यान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे स्वतः घरी येऊन मला उमेदवारी न करण्याची विनंती केली . मात्र तरीही मी माझे तालुक्यांमध्ये संपर्क दौरा चालू ठेवले. दोन दिवसापूर्वी पक्षाचे संघटन मंत्री विजयराव पुराणिक व मंत्री राधाकृष्ण विखे हे पुन्हा घरी आले .पुन्हा विनंती केली .माझे वडील खासदार दिलीप गांधी यांनीही ही पहिल्या दिवशी मला उमेदवारी न करण्याचे सूचना केल्या होत्या .मी माझ्या आई-वडिलांचा ऐकणारा मुलगा आहे .म्हणून मी उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी शहर भारतीय जनता पार्टीचे संघटनमंत्री संघटन सरचिटणीस किशोर श्रीकांत साठे आदींसह शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर