शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019: किती दिवस पवारांची चमचेगिरी करणार ? : पंकजा मुंडे यांचे धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 20:52 IST

डॉ.सुजय विखे बोलेपर्यत मला शंकाच होती. पण त्यांनी अतिशय उत्कृष्ट भाषण केले. विरोधक आमच्या उमेदवारांची पात्रता विचारतात. पण दोन वाक्ये बोलता न येणारांची पात्रता विचारत नाहीत.

अहमदनगर : डॉ.सुजय विखे बोलेपर्यत मला शंकाच होती. पण त्यांनी अतिशय उत्कृष्ट भाषण केले. विरोधक आमच्या उमेदवारांची पात्रता विचारतात. पण दोन वाक्ये बोलता न येणारांची पात्रता विचारत नाहीत. आमचेच बंधू पवारांची लाचारी करत आहे. पार्थ सरस की रोहित असे विचारल्यानंतर पवार महत्त्वाचे असल्याचे सांगतात. अरे किती दिवस पवारांची चमचेगिरी करणार ? असा सवाल ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना केला.अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील  भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पाथर्डीतील सभेत त्या बोलत होत्या. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, आमदार शिवाजी कर्डिले उपस्थित होते.पंकजा मुंडे म्हणाल्या, आमच्यावर आक्षेप घेणा-या दरिद्री लोकांना त्यांची जागा दाखवा. पण लोक हुशार झाले आहेत. आमचे विरोधक म्हणतात हेबाहेरचे आले. यांना कळते का कोण बाहेरचे आहे? आम्ही येथेच जन्मलो आहोत आणि लहानाचे मोठे झाले आहे. आजकालची तरुण पोरं भाषण करतात का याविषयी मला शंकाच आहे. सुजय एक तरूण आहेत. त्यामुळे ते बोलेपर्यत मला शंका होती. पण त्यांनी अतिशय उत्कृष्ट भाषण केले. बीड आणि अहमदनगरमध्ये शेजारी शेजारी दोन डॉक्टर खासदार होणार आहेत. डॉ. प्रीतम मुंडे यांची पात्रता विचारता पण दोन वाक्ये बोलता न येणारांची पात्रता विचारात नाहीत. पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्यामधील कोणता नेता उत्कृष्ट आहे ? असा प्रश्न आमच्या भावाला विचारला. त्यावेळी ते म्हणाले. पार्थ आणि रोहित महत्वाचा नाही तर पवार महत्वाचे आहेत. अरे किती पवारांची चमचेगिरी करणार? तुम्हाला तुमच्या पक्षातील घराणेशाही दिसत नाही. तुमच्या पक्षातील अर्धा डझन उमेदवारी घरातच दिली. हे दिसत नाही. आणि इकडे विखे यांची घराणेशाही तुम्हाला दिसते. नगरमध्ये सगळीकडून घुसखोरी सुरु आहे. राम शिंदे यांच्या मतदारसंघातही बारामतीची घुसखोरी सुरु आहे. तिथे बाहेरचा दिसत नाही. प्रियांका गांधी यांना चालतात. तिथे नाही विचारत नाही वड्रा नाव का लावता. आमचे उमेदवार इथलेच उमेदवार आहेत. याच मातीतला उमेदवार आहे. आम्ही काय पाकिस्तान, चायनातून आलो आहोत का ? असे टीकास्त्र मुंडे यांनी सोडले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर