शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

Lok Sabha Election 2019 : अहमदनगरमध्ये आजी-माजी आमदारांची होमपीचवर दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 12:23 IST

अहमदनगर लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य देण्याचे स्थानिक नेत्यांनी जाहीर केले खरे, पण प्रत्यक्षात मतांची टक्केवारी वाढविण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे.

अण्णा नवथरअहमदनगर: अहमदनगर लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य देण्याचे स्थानिक नेत्यांनी जाहीर केले खरे, पण प्रत्यक्षात मतांची टक्केवारी वाढविण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. मागील दोन निवडणुकांमधील मतांची टक्केवारी पाहता या मतदारसंघावर भाजपचा पगड असल्याचे दिसते़ परंतु, मोदी लाट ओसरल्याने स्थानिक नेत्यांची दमछाक होणार आहे़आघाडी व युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ तालुक्यांना सभांचा धडाका सध्या सुरू आहे़ स्थानिक नेत्यांकडून आपल्या तालुक्यातून निश्चितच मताधिक्य देऊ, असे छातीठोकपणे सांगितले जात आहे़ प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे उमेदवारांना शक्य नाही़ त्यामुळे त्यांची भिस्त आता स्थानिक नेत्यांवरच आहे़ २००९ च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांचा ४६ हजार ७३१ मतांनी पराभव केला होता़ २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट होती़ त्यामुळे गांधी यांच्या मतांची टक्केवारी वाढून त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा २ लाख ९ हजार मतांनी पराभव केला होता़ २००९ मध्ये गांधी यांना राहुरी आणि पारनेर वगळता शेवगाव- पाथर्डी, नगर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत-जामखेडमधून काही हजारांचे मताधिक्य मिळालेले होते़ २०१४ मध्ये गांधींना शेवगाव-पाथर्डी वगळता पाच मतदारसंघातून मताधिक्य मिळाले होते़ शेवगाव- पाथर्डीत मोदी लाटेचा परिणाम झाला नाही़ २००९ मध्ये राष्टÑवादीचे उमेदवार कर्डिले यांना राहुरी विधानसभा मतदारसंघातून १४ हजार, तर पारनेरमधून ९०३ चे मताधिक्य मिळालेले होते़ २०१४ मध्ये राष्ट्रवादीचे राजीव राजळे यांनी पाथर्डीतून ११ हजारांचे मताधिक्य घेतले होते़ परंतु, इतर पाच मतदारसंघांनी त्यांना साथ दिली नाही़ त्यामुळे त्यांचा पराभव झाला़ मागील दोन निवडणुकांतील पराभव राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे़ त्याचा बदला घेण्यासाठी राष्ट्रवादीने सहा विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे़ भाजपविरोधी मते मिळविण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे़ परंतु, भाजपने काँग्रेसचे डॉ़ सुजय विखे यांचा पक्ष प्रवेश करून त्यांना उमेदवारी दिली आहे़ त्यामुळे कुठल्या मतदारसंघातून कुणाला मताधिक्य राहील, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. स्थानिक नेत्यांची आपआपल्या उमेदवारांना मताधिक्य देण्यासाठी दमछाक होणार आहे.शिवसेना-भाजप युतीपाथर्डी : आमदार मोनिका राजळेराहुरी : शिवाजीराव कर्डिलेपारनेर : आमदार विजय औटीनगर शहर : माजी आमदार अनिल राठोडश्रीगोंदा : बबनराच पाचपुतेकर्जत - जामखेड : पालकमंत्री राम शिंदेकाँग्रेस-राष्टÑवादी आघाडीशेवगाव: माजी आमदार चंद्रशेखर घुलेराहुरी : प्राजक्त तनपुरेपारनेर : सुजित झावरे, निलेश लंकेनगर शहर : आमदार अरूण जगताप,माजी आमदार दादा कळमकरश्रीगोंदा : आमदार राहुल जगताप,राजेंद्र नागवडेकर्जत : जामखेड- रोहित पवार, मधुकर राळेभात, दत्ता वारे, राजेंद्र गुंड, गुलाब तनपुरे़

विधानसभा मतदारसंघनिहाय मते २०14शेवगाव- पाथर्डीराष्टÑवादी 1,01,543भाजप 89,764मताधिक्य- भाजप 11,779राहुरीराष्ट्रवादी 60,350भाजप 1,01,751मताधिक्य- भाजप 41,701कर्जत-जामखेडभाजप 10,6552राष्ट्रवादी 65,373मताधिक्य- भाजप 41,179

श्रीगोंदाराष्ट्रवादी 55,389भाजप 11,3643मताधिक्य- भाजप 58,254पारनेरभाजप 1,0,3308राष्टÑवादी 61,921मताधिक्य- भाजप 21,087नगर शहरभाजप 89,258राष्टÑवादी 50,993मताधिक्य- भाजप 38,265

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर