शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

Lok Sabha Election 2019 : अहमदनगरमधून एकही महिला खासदार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 16:11 IST

संसदीय राजकारणात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची मागणी सर्वच पक्षांकडून होत असली तरी, आजवरच्या लोकसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून महिलांना उमेदवारी देताना हात आखडता घेतल्याचे दिसते़

अण्णा नवथरअहमदनगर : संसदीय राजकारणात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची मागणी सर्वच पक्षांकडून होत असली तरी, आजवरच्या लोकसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून महिलांना उमेदवारी देताना हात आखडता घेतल्याचे दिसते़ अहमदनगर लोकसभा निवडणूक मैदानात अभिनेत्री दीपाली सय्यद वगळता एकाही निवडणुकीत महिलांना मैदानात उतरविलेले नाही़ यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून अनुराधा नागवडे यांच्या नावाची चर्चा होती़ परंतु, त्यांचे नाव मागे पडले़ त्यामुळे यंदाही महिला खासदार होतील, याची सुतराम शक्यता नाही. राष्ट्रीय राजकारणात महिलांना आरक्षण देण्यासंदर्भात सर्वच राजकीय पक्षांचे जिल्ह्यातील नेते तोंड पाटीलकी करत असले तरी उमेदवारी वाटप करताना महिलांना संधी दिली गेली नाही़अहमदनगर जिल्ह्यातील आजवरच्या लोकसभा उमेदवारांच्या यादीवर नजर टाकली असता सन १९५१ पासून एकाही राजकीय पक्षाने महिलांना उमेदवारी दिली नाही़ यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांचे नाव राष्ट्रवादीकडून मध्यंतरी पुढे आले होते़ परंतु, हे नावही आता मागे पडले आहे़ त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही महिलांना स्थान मिळेल, असे वाटत नाही़अहमदनगर लोकसभा आणि पूर्वीच्या नगर दक्षिण मतदारसंघातून एकाही राजकीय पक्षाने महिलांना उमेदवारी दिली नाही़ अहमदनगर जिल्ह्याने राज्याला अनेक बडे नेते दिले़जिल्ह्यात विखे, गडाख, जगताप, नागवडे, राजळे, ढाकणे, काळे, कोल्हे, घुले यासारखी प्रमुख राजकीय घराणी आहेत़ त्यांच्याभोवतीच जिल्ह्याचे राजकारण फिरते़ यापैकी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा आहेत़ माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा आहेत़शेवगाव- पाथर्डीच्या जनतेने मोनिका राजळे यांना विधानसभेत पाठविले़ आमदार स्नेहलता कोल्हे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत़ याशिवाय महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींत महिलांना संधी दिली गेली़ पण संसदीय राजकारणातून महिलांना डावलले गेले़ या मतदारसंघात नेहमीच साखर सम्राटांचे वर्चस्व राहिले आहे़ मात्र, महिला उमेदवारांना अद्याप एकाही पक्षाकडून तिकीट दिले गेलेले नाही़८ लाख ७१ हजार महिला मतदारअहमदनगर लोकसभा मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या १८ लाख ३१ हजार आहेत़ यापैकी ८ लाख ७१ हजार महिला मतदार आहेत़ महिलांची मते मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत़ परंतु, या मतदारसंघातून महिलांना उमेदवारी दिली गेली नसल्याचे दिसते़

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९