शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

Lok Sabha Elecation 2019 : इंपोर्टेड गाड्यांसाठी जगतापांकडे पैसा आला कोठून? सुजय विखेंची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 12:15 IST

माझ्याकडे दहा इम्पोर्टेड गाड्या आहेत, असे विधान स्वत: संग्राम जगताप यांनीच कार्यकर्त्यांसमोर केले आहे.

अहमदनगर : माझ्याकडे दहा इम्पोर्टेड गाड्या आहेत, असे विधान स्वत: संग्राम जगताप यांनीच कार्यकर्त्यांसमोर केले आहे. या इर्म्पोटेड गाड्या घेण्यासाठी त्यांच्याकडे एवढा पैसा आला कोठून? हे सांगण्याची ही वेळ नाही़ गरिबांसाठी पैसे खर्च करण्याची तुमची दानत आहे का? हेही सांगा, असे खुले आव्हान भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी मंगळवारी जगताप परिवाराला दिले.महापालिकेत विकासासाठी भाजपला पाठिंबा दिला, असा जगताप यांचा दावा आहे. त्यामुळे आताही विकासासाठी भाजपला पाठिंबा देऊन टाका, अशी आॅफरही विखे यांनी दिली आहे.भाजप-शिवसेना मित्रपक्ष कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते़ राष्ट्रवादीचे उमेदवार जगताप यांनी केलेल्या, आपल्याकडे चॉपर नाही, पण इंर्पोटेड गाड्या आहेत़ एक नाही तर दहा आहेत, या विधानाचा सुजय विखे यांनी चांगलाच समाचार घेतला़ ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत पैसा हा निकष नाही़ पैसा सगळ्यांकडेच असतो़ पण, त्याचा उपयोग सर्वसामान्यांसाठी करण्याची दानत असावी लागते़ ती विखे कुटुंबाकडे आहे़ गेल्या तीन वर्षात दीड लाख रुणांवर उपचार केले़ दक्षिणेतील रुग्णांनी विळदघाटात उपचार घेतले़ मग मी बाहेरचा कसा, मी जेवढी कामे केली़ त्यापैकी दहा टक्के कामे तुम्ही केली असतील तर ते सांगा मी आजच माघार घेतो, असे आव्हान विखे यांनी जगताप यांना केले़काँग्रेसच्या महामेळाव्यावरही बोलताना विखे म्हणाले, की विधानसभा निवडणुकीच्यावेळी माजीमंत्री बाळासाहेब थोरात नातेवाईकाच्या प्रचाराला आले़ सध्याच्या उमेदवारांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढविली़ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले़ ते काँग्रेसचे नेते विसरले़ विधानसभा ज्यांच्याविरोधात लढविली, त्यांचा आता काँग्रेसचे नेते प्रचार करत आहेत, मग तुम्हीच सांगा पक्षनिष्ठा कुणाकडे आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला़ महापालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून शहरात पहिल्यांदा एन्ट्री केली़ काँग्रेसचे पाच उमेदवार भाजपमध्ये गेले़ मी विचार केला गेले तर जाऊ द्या़ नवीन उमेदवार तयार केले़ निवडणूक पार पडली़ महापौर निवडणूक आली़ राष्ट्रवादीने भाजपालाच पाठिंबा देऊन टाकला़ विकासाच्या मुद्यावर हा पाठिंबा दिला गेला़याचाच अर्थ भाजपच विकास करू शकते, असा विश्वास त्यांनाही आहे़ मग मी काय चूक केली, ते तुम्हीच सांगा, असे सांगून मी विकासासाठीच निवडणूक लढवित आहे़ विकासाच्या मुद्यावर त्यांनी मलाच पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले़ यावेळी पालकमंत्री राम शिंदे, आ़ शिवाजीराव कर्डिले, सेनेचे उपनेते अनिल राठोड,महापौर बाबासाहेब वाकळे, मोनिका राजळे, अ‍ॅड़ अभय आगरकर, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, चंद्रशेखर कदम, सेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, रासपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष रवींद्र कोठारी उपस्थित होते़मुळासकट याचा अर्थ मारुन टाकतात - राठोडदेशातील ४७ न्यूरोसर्जन आहेत़ त्यापैकी डॉक्टर सुजय विखे एक आहेत़ आमचा उमेदवार न्यूरोसर्जन, आहे असे म्हणून तेही डॉक्टर असल्याचे सांगत आहेत़ आम्ही मुळासकट उपचार करतो, असेही ते म्हणतात़ मुळासकट याचा अर्थ थेट मारूनच टाकतात, अशी टीका अनिल राठोड यांनी केली़महापालिकेत आता तरी युती करामहापालिका शिवसेनेच्या हाती देण्याची नगरकरांची इच्छा होती़ शिवसेनेचे २४ नगरसेवक निवडून आले़ पण त्यांचा पाठिंबा घेऊन सत्ता स्थापन केली गेली, असे सांगून कमाल आहे आपल्या सर्वांची! आता तरी महापालिकेत युती करा, अशी मागणी अनिल राठोड यांनी यावेळी बोलताना केली़गांधींचा निर्णय दोन दिवसातखासदार दिलीप गांधी यांची काळजी करू नका़ त्यांच्याबाबतचा निर्णय पुढील दोन दिवसात घेण्यात येईल, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी यावेळी सांगितले़‘कुणाला काहीही म्हणू द्या गुलाल सुजयच घेणार’डॉ़ सुजय विखे यांना आपणच राहुरीच्या कारखान्यात आणले़ ते आता भाजपात आले असून, कुणाला काही म्हणू द्या, सुजय विखेच निवडणूक जिंकतील़ सर्वाधिक मतांनी निवडून येणाऱ्या देशातील पहिल्या पाच उमेदवारांमध्ये सुजय विखे यांचा समावेश असेल, अशी ग्वाही भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दिली़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९