शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

लोहसर ग्रामपंचायत राज्यभर राबवतेय ‘स्मृती वृक्ष’ योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2017 18:06 IST

लोहसर (ता. पाथर्डी) ग्रामपंचायतीच्या वतीने राज्यभर ‘स्मृती वृक्ष’ (दत्तक वृक्ष) अशी एक नवी संकल्पना राबविण्यात येत आहे.

 आॅनलाइन लोकमत

अनिल लगड, अहमदनगर, दि. ३१ - आदर्श गावाकडे वाटचाल करणाºया व ‘ग्रीन व्हिलेज’ संकल्पना राबवित असलेल्या लोहसर (ता. पाथर्डी) ग्रामपंचायतीच्या वतीने राज्यभर ‘स्मृती वृक्ष’ (दत्तक वृक्ष) अशी एक नवी संकल्पना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत असून, एकाच दिवसांत ३२ हजार रुपये जमा झाले असून, आठ दिवसांत दोन ते अडीच लाख रुपये जमा होतील, अशी माहिती सरपंच अनिल गिते पाटील यांनी दिली. 
लोहसर-पवळवाडी ग्रामपंचायतीला नुकताच वनखात्याचा वनग्राम पुरस्कार मिळाला आहे. लोहसरला ‘स्मृती वृक्ष’ (दत्तक वृक्ष) अशी एक नवी संकल्पना राबवत आहे. गाव अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या वृक्षांची त्यामध्ये निवड केली आहे. एक झाड, सिमेंट कुंडी, रंग, आपल्या नावाचा फलक, लागवड खर्च व ठिबक असा एकूण २००० रुपये खर्च येतो. या योजनेत  ५० टक्के रक्कम देऊन प्रतिझाड १००० देणगी देऊन सहभागी होऊ शकता. ५० टक्के खर्च ग्रामपंचायतीचा असेल. वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च, लग्नातील सत्काराचा अनावश्यक खर्च किंवा घरातील मृत व्यक्तीच्या स्मृतिप्रीत्यर्थ यासाठी राज्यातील कोणतीही व्यक्ती मदत देऊ शकते. आपल्या पिढीभर त्या वृक्षावर आपले नाव, आपल्या आठवणी, स्मृती जाग्या राहतील. या योजनेत किमान दोन, तीन ‘स्मृती वृक्ष’ दत्तक घेऊन (२ ते ३ हजार रुपये) देणगी देऊन सहभाग नोंदवू शकता. या योजनेची स्वतंत्र सक्षम व नि:स्वार्थीपणे अविरत काम करणारी समिती असून, सदर समिती लोहसर गाव अंतर्गत असलेले वृक्ष व लोहसर वनातील वृक्ष यांची देखभाल व येणाºया निधीचा पारदर्शक (जमा खर्च) कारभार करते. या योजनेत महाराष्ट्रातील कुठलीही व्यक्ती सहभाग घेऊ शकते, ग्रामपंचायतीच्या वतीने त्या दात्याचा स्मृतिचिन्ह देऊन उचित सन्मान केला जाईल. तरी ‘ग्रीन व्हिलेज’ लोहसर या संकल्पनेला आपल्या अनमोल सहभागाची व या कायार्तून होणाºया निसर्ग संवर्धनाची ग्रामस्थांना अपेक्षा आहे.
सदर संकल्पना राज्यातील सर्व गावात राबविणे शक्य आहे. इतर गावातही अशा योजना राबविता येतील यासाठी याचा प्रसार-प्रचार होण्यासाठी योजनेत आर्थिक स्वरूपात सहभागी होता आले नाही तरी चालेल, परंतु हा संदेश सर्व सोशल मीडियावर पाठवावा. आम्ही आपले कृतज्ञ राहू, असे सरपंच अनिल गिते यांनी सांगितले़
लोहसर ग्रामपंचायतीने सोशल मीडियावर केलेल्या आवाहनानुसार एकाच दिवसात ३२ हजार रुपये रक्कम समितीच्या नावावर जमा झाली आहे. देणगीदारांची नावे अशी-सुनील हरिश्चंद्र दरे (नगर)-२०००, प्रशांत गिते (मुंबई)-१०००, अक्षय भालेराव (नगर)-२०००, नवनाथ पालवे-१०००, अक्षय दगडखैर-२०००, अभिजित मराठे-२०००, जयप्रकाश गिते-२०००, विष्णू बडे (बीड)-२०००, जितेंद्र (पूर्ण नाव माहिती नाही-मुंबई)-५०००, दीपक चन्ने-१०००, ज्ञानेश्वर चव्हाण (मुंबई)-२०००,घनश्याम पित्रोदा-२०००, नवनीत सुरपुरीया-२०००,सुनील गर्जे-२०००, अजय बोरा-२०००, सौरभ बोरकर- २००० अशी जवळपास २२ हजार रुपये, तर आजपर्यंत २५ हजार रुपये बँकेत जमा झाले आहेत. संयुक्त वन व्यवस्थापन समिती, लोहसर (ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) या नावाने शिराळ चिचोंडी येथील सेंट्रल बँक इंडियात खाते उघडण्यात आले आहे. खाते नंबर ३५९३५०९९०६ असा आहे. बँकेचा आयएफएससी कोड-सीबीआयएन0-२४२२९५ असा आहे. आठ दिवसांत सुमारे दीड ते दोन लाख रुपये जमा होण्याचा अंदाज सरपंच अनिल गिते यांनी व्यक्त केला आहे. संपर्कासाठी ९५११५५२२२२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने केले आहे.