शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर झेडपीच्या ४९ शाळांना कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 12:56 IST

जिल्हा परिषदेच्या कमी पटसंख्या असलेल्या ४९ शाळा बंद करण्यात आल्या आहेत़ शिक्षण संचालनालयाच्या आदेशाने मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनी शुक्रवारी ही कारवाई केली़ पटसंख्येअभावी शाळा बंद करण्याची ही पहिलीच वेळ आहे़

ठळक मुद्देसर्वाधिक शाळा अकोले तालुक्यातील

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या कमी पटसंख्या असलेल्या ४९ शाळा बंद करण्यात आल्या आहेत़ शिक्षण संचालनालयाच्या आदेशाने मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनी शुक्रवारी ही कारवाई केली़ पटसंख्येअभावी शाळा बंद करण्याची ही पहिलीच वेळ आहे़राज्यातील १ हजार ३०० जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत़ पटसंख्येअभावी बंद करण्यात आलेल्या शाळांमध्ये नगर जिल्ह्यातील ४९ शाळांचा समावेश आहे़ बंद पाकिटातून हा आदेश जिल्हा परिषदेला प्राप्त झाला़ शिक्षण विभागाने याबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे़ संबंधित तालुक्याच्या गट शिक्षण अधिकाºयांना बंद करण्यात येणाºया शाळांची नावे कळविण्यात आली असून, या सदर शाळा तत्काळ बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे़ त्यामुळे शुक्रवारपासून या शाळांना कायमचेच कुलूप लावण्यात आले असून, मुलांना इतर शाळांत पाठविण्यात आले आहे़ मागील शैक्षणिक वर्षांत दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील शाळांची संख्या ८९ होती़चालू वर्षातील वर्गनिहाय पटसंख्या जिल्हा परिषदेकडून मागविण्यात आली आहे़ तसे पत्र शिक्षण विभागाने शाळांना दिले आहे़ पटसंख्येची माहिती अजून जिल्हा परिषदेलाच मिळालेली नाही़ असे असताना शिक्षण विभागाने कुठल्या आकडेवारीनुसार शाळा बंद केल्या, पटसंख्या हा एकमेव निकषलावण्यात आला की आणखी काही निकष आहेत, याबाबत जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागही अनभिज्ञ आहे़जिल्हा परिषद शाळांची सर्व माहिती सरल पोर्टलवर उपलब्ध आहे़ त्याआधारे ही कारवाई करण्यात आली असावी, असे काहींचे मत आहे़ शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी मागील आठवड्यात जिल्ह्यातील प्रगत महाराष्ट्र कार्यक्रमाचा आढावा घेतला होता.अकोले तालुक्यातील सर्वाधिक १४ शाळा शिक्षण विभागाच्या आदेशाने बंद करण्यात आल्या आहेत़ कर्जत तालुक्यातील ९ तर संगमनेरमधील ६ शाळा बंद करण्यात आल्या आहेत़ उर्वरित शाळा जामखेड, नगर, पारनेर, पाथर्डी, राहाता, श्रीगोंदा, श्रीरामपूर तालुक्यातील आहेत़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले