शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कालबाह्य पाणी योजनेवर बोगस नळ कनेक्शनचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शेवगाव : शेवगाव-पाथर्डी शहरासह ५४ गावांसाठी वरदान ठरलेल्या व सध्या कालबाह्य झालेल्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शेवगाव : शेवगाव-पाथर्डी शहरासह ५४ गावांसाठी वरदान ठरलेल्या व सध्या कालबाह्य झालेल्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेवर बोगस नळ कनेक्शनचा अतिरिक्त भार आहे. शेवगाव शहरात १८ हजार घरे (उंबरे) असून नळ कनेक्शन अवघी सात हजार आहेत. याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नियमित पाणीपट्टी भरणारांना विनाकारण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते.

शेवगाव शहराचा विस्तार झपाट्याने सुरू आहे. मात्र, त्यातुलनेत विस्तारलेल्या भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात पालिका प्रशासन, पदाधिकारी असमर्थ ठरत आहेत. आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची ३८ हजार ३७५ लोकसंख्या आहे. प्रत्यक्षात गत दहा वर्षांत लोकसंख्येने ५० हजारांचा आकडा ओलांडला आहे. वाढलेली लोकसंख्या, त्या तुलनेत अपुरी पाणी साठवण क्षमता, गल्लीबोळातील कालबाह्य झालेल्या जलवाहिन्या, पाण्याचा दाब नियंत्रित करण्यासाठी शहरात बसविण्यात आलेले ३१० व्हॉल्व्ह, २ हजारहून अधिक अनधिकृत नळ कनेक्शन, सद्य:परिस्थितीत सुरू असलेला विजेचा लपंडाव यामुळे शहराचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. कालबाह्य झालेल्या जलवाहिनीवरील पाण्याचा दाब नियंत्रित करण्यासाठी शहरात तब्बल ३१० व्हॉल्व्ह बसविण्यात आले आहेत. १८ हजार उंबरे असलेल्या शहरात केवळ ७ हजार नळ कनेक्शन अधिकृत असून काही दिवसांपूर्वी पालिकेने ४०० अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत केले आहेत. याबाबत नगरपालिका प्रशासनाचे म्हणणे समजून घेण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ प्रतिनिधीने केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

---

योजनेचे आयुर्मान संपले..

१९९८ साली कार्यान्वित झालेल्या शेवगाव-पाथर्डी ५४ गावे पाणी पुरवठा योजनेचे आयुर्मान १५ वर्षांचे होते. त्या बाबीलाही आता ७ वर्षे उलटली. त्याच योजनेवर लाखो लोकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. ही योजना कालबाह्य झाल्याने वारंवार जलवाहिनी फुटण्याचे प्रमाण वाढले आहे.

----

पाणी साठवण्यासाठी टाक्यांची कमतरता

५० हजार लोकसंख्येच्या शहरात केवळ १७.५ लाख लिटर क्षमतेच्या पाणी साठवण टाक्या आहेत. पंचायत समितीसमोर ७.५ लाख लिटर तर तहसील कार्यालयाशेजारी १० लाख लिटर पाणी साठवण क्षमता असलेली टाकी आहे. शहराला सरासरी ५५ ते ६० लाख लिटर प्रतिदिन पाणी आवश्यक आहे. त्यामुळे आणखी टाक्या नव्याने बांधणे गरजेचे आहे.

--

करार करण्यास टाळाटाळ..

पालिकेला जिल्हा परिषदेने योजनेंतर्गत करार करण्यासंदर्भात कळविले आहे. शहरात नळ कनेक्शन किती? नागरिक किती? याची माहिती देऊन पाण्याची आवश्यकता, यासंबंधी करार करण्यास दोन वर्षांपूर्वीच सांगितले आहे. मात्र, पालिका करारही करत नाही अन‌् पाणीपट्टीपोटी थकलेले ८ कोटीही भरण्यास टाळाटाळ करत आहे.