शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अत्यवस्थ बिबट्याला मिळाले जीवदान

By admin | Updated: July 13, 2016 00:28 IST

अकोले : धामणगाव आवारी येथील तळेवाडी शिवारातील भाऊसाहेब आवारी यांच्या शेतात एक वर्षे वयाचा अत्यवस्थ बिबट्या आढळून आला.

अकोले : धामणगाव आवारी येथील तळेवाडी शिवारातील भाऊसाहेब आवारी यांच्या शेतात एक वर्षे वयाचा अत्यवस्थ बिबट्या आढळून आला. या बिबट्यास वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक युवकांच्या मदतीने मोटारसायकल वरुन उपचारासाठी सुगाव रोपवाटिकेत नेले. वेळीच उपचार मिळाल्याने बिबट्याची प्रकृती सुधारत असली तरी धोका अद्याप टळलेला नाही, असे प्रभारी पशुधन सहाय्यक आयुक्त डॉ. आर. डी. भांगरे यांनी सांगितले. मंगळवारी दुपारी धामणगाव आवारी येथील भाऊसाहेब आवारी यांच्या शेतात बिबट्या आकळ्या घेत असताना शेतकऱ्यांना दिसला. त्यांनी तातडीने वन विभागाला कळवले. वनपरिक्षेत्रपाल आर. के. सगभोर यांच्या सूचनेवरुन आंबड विभागाचे वनरक्षक घोडसरे, वनमजूर दशरथ आवारी, शिवाजी दौंड खबर मिळताच हजर झाले. त्यांनी वेळ न दवडता स्थानिक युवकांच्या मदतीने सदर अत्यवस्थ बिबट्यास मोटरसायकलवरुन सुगाव रोपवाटिकेत हलवले. तेथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर. डी. भांगरे यांनी उपचार केले. सायंकाळपर्यंत बिबट्याचा ताप उतरला होता, मात्र बिबट्याचा धोका टळलेला नव्हाता.पावसात भिजल्याने त्यास ताप आला असावा तसेच पोटात अन्न नसल्याने तो अत्यवस्थ झाला असावा, असे पशुधन अधिकारी यांनी स्पष्ट केले. डॉक्टर व वनपरिक्षेत्रपाल बिबट्याच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून आहे, ते रोपवाटिकेत तळ ठोकून आहेत. सोशल मीडियावरुन स्थानिक युवकांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.(तालुका प्रतिनिधी)