धामणगावपाट येथे जिल्हा बँकेचे शाखाधिकारी सुभाष घुले यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, बी.जे. देशमुख, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे, जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख, कैलास वाकचौरे, बाजार समितीचे परबत नाईकवाडी अगस्तीचे महेश नवले, रावसाहेब वाळूंज, माणिक देशमुख, मिलिंद नवले, रोहिदास भोर, कैलास राऊत, अशोक शेळके उपस्थित होते.
................
दिवंगत भाऊसाहेब थोरात यांनी सहकाराची चळवळ उभी केली. ऊस उत्पादकांना बाहेरच्या कारखान्यात ऊस द्यावा लागला तर होणारे हाल पाहून डोळ्यात पाणी येते, तेव्हा अकोलेतील सहकारी चळवळ आणि संस्था बंद पडू देऊ नका, असे अगस्तीच्या संदर्भात जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांनी अकोल्यातील नेत्यांचे कान टोचले.
०४ लहामटे