कोल्हे म्हणाले, १९७८ व १९९९ च्या सरकारमध्ये मंत्री होऊनही त्यांनी त्याचा रुबाब आपल्या अंगात कधीही भिनू दिला नाही. त्यांच्याकडून पाण्याचा प्रश्न समजावून घेत मांडणी कशी करायची, याचे ज्ञान आम्ही आत्मसात केले. कायदे करताना सर्वसामान्यांच्या हिताला बाधा येणार नाही यासाठी ते सतत अभ्यासपूर्ण मांडणी विधिमंडळात करत. एखाद्या प्रश्नावर परिस्थिती कितीही हातघाईला आली तरी त्यात समजूतदारपणा कसा घ्यायचा हे नवख्या आमदारांनी त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं. बागायतदारांच्या अडचणींची भूमिका सर्व जण मांडत; पण दुष्काळ आणि जिरायती भागातील प्रश्न तसेच टांगून राहू नये ही भूमिका ते नेहमी घेत. असे नेतृत्व आपल्यातून निघून गेले. त्यांच्या नावाने विधिमंडळात तरुण आमदारांसाठी मार्गदर्शन देणारे स्वतंत्र दालन सुरू करावे. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनीही गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
विधिमंडळाचं अनुभवी विद्यापीठ हरपलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:20 IST